रानमळा येथे श्री धर्मनाथ महाराज (बिज) यात्रे निमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

Share

मंचर (प्रतिनिधी )

रानमळा (ता.आंबेगाव जि पुणे) येथे श्री धर्मनाथ महाराज यात्रा ( बिज ) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार (दि.३१) रोजी सकाळी ७ ते ८ वाजता देवास हारतुरे व महापूजा, सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजता बैलगाड्यांच्या भव्य जंगी जर्यती, सायंकाळी ७ ते ९ वाजता देवास नैवद्य, दिपोत्सव व भव्य मिरवणूक व शोभेचे दारुकाम, रात्री नऊ वाजता तुकाराम खेडकर सह पांडूरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रम होईल.तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वाजता चक्रीय भजनाचा कार्यक्रम होईल.

बैलगाड्याच्या भव्य जंगी जर्यती साठी एकूण इनाम १,७७,०११/ रुपये, तीन कूलर, एक जूपता बैलगाडा, दोन टेबल फॅन, दोन सिलिंग फॅन तसेच . प्रथम क्रमांकास ५१००१/ रूपये, व्दितीय क्रमांकास ४१००१/ रूपये, तृतीय क्रमांकास ३१००१/ रूपये, चतुर्थ क्रमांकास २१००१/ रूपये. घाटाचा राजा यासाठी एकभव्य ट्रॉफी व एक कारभारी सेट तसेच फायनल साठी प्रथम क्रमांकास १५००१/ रूपये, व्दितीय क्रमांकास ११००१/ रुपये, तृत्तीय क्रमांकास ७००१/ रुपये असे बक्षिस ठेवले असून बुधवार (दि.२९) रोजी सकाळी ८ ते १२ वाजता टोकन काढले जातील

टोकन फी १०००/ रूपये असून ५००/ रुपये परत केले जातील व ५००/ रूपये देणगी स्वरूपात स्विकारले जातील. शनिवार (दि.०१) रोजी सकाळी नऊ वाजता देवास दंडवत व शेरणी कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन समस्थ ग्रामस्थ रानमळा (लोणी), मुंबई, ठाणे, पुणे येथील मंडळीनी केले आहे.अशी माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. ___________

Related Articles

ताज्या बातम्या