गहू मळणीसाठी आंबेगावात हार्वेस्टर दाखल.

Share

मंचर

आंबेगावच्या पूर्व भागात पर राज्यातून गहू मळणीसाठी हार्वेस्टर दाखवलेले आहे. गहु बरोबर सोयाबीन, हरभरा व अन्य पिकांची मळणी केली जात आहे.
आंबेगावच्या पूर्व भागातील लोणी धामणी जाकरवाडी लाखनगाव काठापुर देवगाव पोंदेवाडी वडगावपीर, मांदळेवाडी आदी गावांमध्ये दरवर्षी रब्बी हंगामात गव्हाचे पिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात.

यंदा सुरुवातीपासूनच गव्हाला अनुकूल वातावरणाची साथ मिळाल्याने सर्वत्र गव्हाचे पिक जोमदार आले आहे. थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने यंदा उत्पादनात वाढ होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. गहू पिकाची मळणी करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे.


दरवर्षी या परिसरात फेब्रुवारी महिन्यात पंजाब, हरियाणा या परराज्यातील हॉर्वेस्टर यंत्रे गव्हाच्या मळणीसाठी दाखल होत असतात. हॉर्वेस्टर यंत्रांमुळे कमी वेळात, कमी कष्टात गव्हाची मळणी होते तसेच मजुरांची टंचाई त्यामुळे हॉर्वेस्टर यंत्राद्वारे गहू मळणीला शेतकऱ्यांची पसंती असल्याचे दिसून येते.
गव्हाच्या मळणीसाठी हॉर्वेस्टर वाले एकरी चार रुपयांपर्यंत दर घेत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या