अमोल लंके महसूल सहाय्यक पदी निवड

Share

मंचर

लोणी ( ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील अमोल जगन लंके यांची नुकतीच महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. अमोलच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लोणी येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण शिरूर येथे झाले पुणे येथे बीएससी शिक्षण पुर्ण केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची नुकतीच महसूल सहायक पदी निवड झाली आहे.

लोणी परिसर दुष्काळी असल्याने या ठिकाणी शैक्षणिक सुविधा अत्यल्प प्रमाणत आहेत. मात्र, याल जुमानता येथील युवक अभ्यासाच्या जोरावर अधिकारी होऊ पाहत आहेत.

शेवटी जिद्द मेहनत घेत एमपीएससी अंतर्गत घेतलेल्या परीक्षेचा निकाल हाती आला. त्यामध्ये महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याने अमोलचे लोणी धामणी परिसरातुन
सर्व स्तरातून अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या