मंचर
आंबेगाव तालुक्यात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत लाभार्थी वंचित राहू नये अशा आशयाचे निवेदन आंबेगाव तालुका भाजपा ( पूर्व ) अध्यक्ष किरण वाळुंज यांनी आंबेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात लाभार्थी वंचित न राहण्याची विनंती केली असून प्रधानमंत्री आवास योजनेची जनजागृती करुन नागरिकांना सदर योजनेची माहिती द्यावी. प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्वेचे काम सुरू असून 31 मे 2025 ही अंतिम तारीख आहे. आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान किरण वाळुंज यांनी केली आहे यावेळी धामणी चे माजी सरपंच सागर जाधव शंकर महाराज गोरक्ष भोजने यावेळी उपस्थित होते.
