ड्रोनद्वारे बेकायदेशीर चित्रीकरण; चौघांविरुद्ध पारगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Share

मंचर (प्रतिनिधी) , २ मे २०२५:
वडगावपीर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील खडी मशिनवर बेकायदेशीरपणे ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वसंत पडवळ (वय ५१, रा. सविंदने, ता. शिरूर) यांच्या खडी क्रशरवर २८ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.१५ ते १०.३० दरम्यान ही घटना घडली.

आरोपी अमोल मारूती ढगे आणि सोमनाथ तान्हाजी ढगे (दोघेही रा. मांदळेवाडी, ता. आंबेगाव) यांनी होंडा एच.एफ. डिलक्स क्र.एम.एच.१४-७०३१) तर विघ्नेश दत्तात्रय शिंदे आणि यश अशोक शिंदे (दोघेही रा. अवसरी खुर्द) यांनी पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरून (क्र. एम.एच.१४ एम.जी.३४९४) घटनास्थळी येऊन ड्रोनद्वारे बेकायदेशीर चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. चित्रीकरणानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल व सोमनाथ ढगे यांच्या सांगण्यावरून विघ्नेश शिंदे व यश शिंदे यांनी चित्रीकरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भा.न्या.संहिता कलम ३२९(३), ३(५) अंतर्गत गुन्हा (गु.रजि. क्र. ४९/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कालेकर (ब. नं. १३१२) करत असून, दाखल अंमलदार म्हणून पोलिस हवालदार मडके (ब. नं. २०७८) काम पाहत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या