मंचर
वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील मूळ रहिवासी व सध्या ठाणे शहर पोलिस दलामध्ये कार्यरत असणारे काळूराम बाबूराव आदक यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागामध्ये पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे.
वडगावपीर येथील शेतकरी कुटूंबातील काळूराम आदक ठाणे शहर पोलिस दलामध्ये ‘ पोलिस ‘ म्हणून भरती झाले. आणि आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांना पदोन्नती मिळाली.त्यामुळे त्यांचे वडगावपीर परिसरात ग्रामस्थ आणि मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतूक होत आहे.
