मंचर प्रतिनिधी
खरीप हंगामात घेतले जाणारे पीक म्हणजे बाजरी, परंतु खरीप हंगामात होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगावा तालुक्यातील शेतकरी घोडनदीकाठी व डाव्या ,उजव्या कालव्यालगत असणाऱ्या गावांमध्ये उन्हाळी बाजरीचे पीक घेतात. एकरी सरासरी १०-१२ क्विंटल उत्पन्न निघत असून, खर्च व नुकसान होत नसल्याने उन्हाळी बाजरीचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे.
मेंगडेवाडी निरगुडसर जारकरवाडी पोंदेवाडी काठापूर पारगाव शिंगवे लाखणगाव गावात भागात सध्या बाजरीचे पीक काढणीचे काम सुरू आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात यंदा उन्हाळी बाजरीचे मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली होती. उशिरा पेरा असलेल्या बाजरीच्या पिकाचे मान्सूनपूर्व पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

या पिकाला विमा कवच नाही आंबेगाव तालुक्यात गेली आठ दिवसापासून पावसाची संततदार सुरू असून या पावसामुळे तरकारी पिकांसह बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जारकरवाडी ता आंबेगाव येथील बाजरी उत्पादक शेतकरी लहानु धनगरमाळी यांच्या एक एकरातील बाजरीचे मान्सून पूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतातच बाजरीचे कणसे भिजल्याने त्यांना मोठे प्रमाणात धान्य सह आर्थिक तोटा सोसावा लागणार आहे
