मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी ते शिरूर तालुक्याच्या हद्दीतील सविंदणे फाटा या रस्त्यासाठी साठ लाख रुपयाचा निधी आमदार दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला होता.

सदर रस्त्यावर काँक्रिटीकरण व डांबरीकरण करण्यात आले असून हे काम पूर्णत्वाकडे असल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले. अनेक वर्षापासून हा रस्ता दुरुस्ती अभावी दुर्लक्षित पडला होता. त्यामुळे या रस्त्यावरील दळणवळण कमी प्रमाणात झाली होती हा रस्ता झाल्याने पोंदेवाडी व सविंदणे गाव दळणवळणासाठी जोडले गेल्याचे उपसरपंच संदीप पोखरकर, महेंद्र पोखरकर, अमोल वाळुंज यांनी सांगितले. शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतीपर्यंत येणे शेतकऱ्यांनी पिकवलेला माल बाजारात पोचवणे आदी बाबी सुखकर झाले आहे.
दळणवळण सुधारणा ही बाब शेती व ग्रामविकासातील सर्वात महत्त्वाची बाब आहे आजही ग्रामीण भागात दुर्गम किंवा अनेक गावे रस्त्यांच्या मुख्य प्रवाहापासून बरेच अंशी दूर आहे
