पोंदेवाडीत तीन एकर फ्लॉवर पाण्यात

Share

मंचर

पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील शेतकरी कुंडलीक पोखरकर यांनी साधारण एक महिन्यापूर्वी तीनं एकर क्षेत्रावर पस्तीस हजार फ्लॉवरची लागवड केली होती फ्लॉवर पिकही जोमदार होते परंतु गेली आठ दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने तीन एकरच्या फ्लॉवर पाणी फिरले आहे.

फ्लावर पिकासाठी एक लाखाहून अधिक खर्च झाला होता मुलांच्या शिक्षणाची चिंता, मजुरांचे देणे, पेरणीचं संकट… हाती यायचं होतं उत्पन्न, पण हाती आला फक्त चिखल. हे केवळ पावसाचं नुकसान नाही, तर शेतकऱ्याच्य कष्ट पावसात वाहून गेलेलं भविष्य दिसतंय, अशी प्रतिक्रिया पोखरकर यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे
अनेक शेतकऱ्यांचे गवार भेंडी फ्लावर कांदा कांदा पिक शेतातच सडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मजुरांचे पैसे देणे बाकी आहे, मुलांची फी भरायची आहे, आता पेरणीचे दिवस आलेत… खत, बी-बियाणे कुठून आणायचे? फ्लॉवरचे पीक आणि त्यापासून मिळणारे आर्थिक उत्पन्न हे शेवटी स्वप्नच राहिले. शासनाने अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून द्यावी.
कुंडलिक पोखरकर नुकसान ग्रस्त शेतकरी

Related Articles

ताज्या बातम्या