अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी.

Share

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा- बारा दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संततधार पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हावालदिल झाला आहे. पाऊस कधी उघडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून, नुकसान भरपाई द्या, अशी मागणी ख. वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.


आंबेगाव तालुक्यातील विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे टँकर सुरू असलेल्या गावांमध्ये सध्या टँकर मागणीला ब्रेक लागला आहे.
‘अवकाळी’ने तालुक्यात अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान केले. शेतात पाणी साठून कांदा, टोमॅटो, वांगे, गवार , भेंडी, फ्लावर,भाजीपाला, डाळिंब बागांसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात पावसाचा चांगलाच फटका पिकांना बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यंदा मे महिन्यातच ‘अवकाळी’ने दमदार हजेरी लावल्याने पाण्याचे संकट काही प्रमाणात कमी झाले आहे. महसूल व कृषी व विभागाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यास मदत करावी अशी मागणी धामणीच्या सरपंच रेश्मा बोर्हाडे यांनी केली आहे

Related Articles

ताज्या बातम्या