वडगावपीरला अवकाळी पावसाचा तडाखा – रस्ते, शेत जमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Share

मंचर प्रतिनिधी

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथे सोमवार (दि.२६) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते.गेली पाच ते सहा दिवस पडणार्या जोरदार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे .येथील नागरीकांना पाच सहा दिवस घराबाहेर पडता आले नाही.

सोमवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे ओढे व नाल्यांना पूर आला आहे. जोरदार पावसामुळे गुळवेवस्तीकडे जाणार पूल पुरामुळे खचला आहे. सतत पडणार्या पावसामुळे खरीप हंगाम लांबणीवर जाणार असल्याचे शेतकर्यांचे मत आहे.

वडगावपीर परिसरात गेली पाच सहा दिवस पडणारा पाऊस रेकॉर्ड ब्रेक पाऊस असून गेल्या पन्नास वर्षात मे महिन्यात एवढा जोरदार पाऊस पडला नाही. असे ॲड. अवधूत तात्या राजगुडे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या