मंचर
जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील वैदवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वैदवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक उत्सव समितीनी दिली.

शनिवारी ( दि.३१) रोजी सदर कार्यक्रम पार पडणार असून यामध्ये रक्त दान शिबिर, बाळशिराम महाराज मिंडे यांचें व्याख्यान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली अन्न प्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार असून पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान उत्सव समितीने केले आहे.
