मंचर बस स्थानकांमध्ये खड्डेच खड्डे, प्रवाशांचे हाल

Share

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील मंचर बस स्थानकांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
मॉन्सूनपूर्व पावसाचे आंबेगाव तालुक्यात जोरदार आगमन झाल्याने . या पावसाने मंचर बसस्थानक आणि परिसरात चिखल आणि जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामधून मार्गक्रमण करणे प्रवाशांसाठी जिकिरीचे झाले आहे.यामध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

बसस्थानकाच्या परिसरातील कामे करताना गटारे बुजली गेल्याने पाण्याचा निचरा न होता चिखल व खड्डे तयार होत आहेत .यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केली आहे. दहा-बारा दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे.हे पाणी प्रवाशांच्या कपड्यांवर उडत आहे.त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आंबेगाव

आंबेगाव तालुक्यातील मंचर हे तालुक्याचे केंद्रबिंदू असून तसेच या बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. शालेय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी परिसरातील गावातील शेकडो विद्यार्थी येथील बस स्थानकात दररोज येत असतात.

पावसाळ्याच्या दिवसात बसस्थानकातील या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने प्रवाशांना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खड्ड्यातून वाट शोधावी लागते आहे . बस स्थानकात प्रवेश करताना अनेक बसचालकांना खड्डा वाचविताना कसरत करावी लागते आहे. परिवहन विभागाने याबाबत लक्ष घालून बस स्थानकातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी व तालुक्यातील नागरिकांनी केली आहे

Related Articles

ताज्या बातम्या