जारकरवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी खंडू भोजने, उपाध्यक्षपदी बाळु लबडे यांची बिनविरोध निवड

Share

मंचर

जारकरवाडी ( ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी खंडू भोजने तर उपाध्यक्षपदी बाळु शंकर लबडे ( ठकाचा ) यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष सुर्यकांत लबडे व उपाध्यक्ष गणेश खुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवड प्रक्रिया मंचर येथे पार पडली. यावेळी संचालक संतोष कापडी, बाळु लबडे, सुभाष भोजने, यमुना कापडी, गणेश खुडे आदी संचालक उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विवेक वाघमारे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव नवनाथ मंचरे यांनी काम पाहिले. यावेळी शिवाजी भोजने, कांताराम कापडी, राघुनाना वणवे, बाबाजी देवडे, चिंतामण भोजने, आनंदा भोजने,अशोक धानापुणे, एकनाथ भोजणे, लक्ष्मण भोजने, जालिंदर भोजने, मनाजी भांड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष खंडू भोजने व उपाध्यक्ष बाळु लबडे यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या