मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मेंगडेवाडी , जारकरवाडी, धामणी, वाळूजनगर, लाखणगाव, पोंदेवाडी, जारकरवाडी, बढेकरमळा परिसरात गवार तोडणीची लगबग सुरू आहे. गवारीला ६० पासून ते १०० रू. किलोला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी आनंदीत आहे.

पूर्व भागात शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात गवार लागवड केली आहे. लागवडीनंतर गवार साधारण 40 ते 45 दिवसांत तोडणीला येते. गवारीचे सहा ते सात तोडे होतात. बाजारभाव चांगला मिळाला तर दोन पैसेही मिळतात.
यंदा या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गवारीसह तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे गवार उत्पादक शेतकरी सुरेश बढेकर यांनी सांगितले.
