पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भांड यांचा पोलीस महानिरीक्षकांकडुन सन्मान

Share

मंचर

जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील सुपुत्र रवींद्र सुखदेव भांड यांचा संजय दराडे पोलीस विशेष महानिरीक्षक ( कोकण परीक्षेत्र नवी मुंबई ) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रवींद्र भांड हे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करत आहे.

कुडाळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयितांना कुडाळ पोलिसांनी गजाआड केले होते या संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास कामात महत्त्वाची भूमिका बजावत प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने त्यांचा हा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाचे जारकरवाडी ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या