पूर्व आंबेगावात चोरट्यांच्या उपद्रवासह बिबट्याची दहशत

Share

निरगुडसर
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी धामणी जारकरवाडी लाखणगाव काठापूर पारगाव आदी गावांमध्ये चोरट्यांच्या उपद्रवाबरोबर बिबट्याची दहशत वाढली आहे काठापूर बु !!( ता. आंबेगाव ) येथील गणेशवस्ती येथे ( दि. २१ ) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर जाधव व पत्नी कमल ज्ञानेश्वर जाधव या वृद्ध दाम्पत्याला मारहाण करीत लाखो रूपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला तर या मारहाणीत वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.

तर लोणी येथील शेतकरी सावळेराम सिनलकर यांच्या गोठ्यातुन तीन बोकड व चार शेळ्या चोरी गेली असून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे व जारकरवाडी हद्दीतील वैदवाडी येथील शेतकरी सागर कजबे यांच्याही घराजवळुन सात शेळ्या चोरी गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


यामध्ये शेतकरी सिनलकर व कजबे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यासोबतच बिबट्याची दहशत या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढली असून बिबट्या माणसांसह पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहे चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने व बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करू लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या