मुंबई (प्रतिनिधी)
५ डिसेंबर रोजी महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमात दिली होती.त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री पद सोडले जाऊ शकते उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्यावर येऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे
स्पष्ट बहुमत मिळूनही महायुतीकडून मुख्यमंत्री निवडीला उशीर होत असल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले होते. आज अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई दाखल होऊन प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत. गेली तीन दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात विश्रांतीसाठी गेले होते.त्यानंतर ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले होते.
आज एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यात भाजपाला यश..?
भाजपासाठी आपल्या नेत्याशी फारकत कत घेऊन एकनाथ शिंदे भाजप सोबत गेले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केले जाईल अशी शक्यता असताना मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर वरिष्ठ पातळीवर एकमत झाले आहे. देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री पद मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेले तीन दिवस एकनाथ शिंदे यांची पडद्यामागून समजूत काढण्याची भाजपाने पुरेपूर प्रयत्न केले असून देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना शब्द दिला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार एकत्रित शपथविधी सोहळ्यात दिसतील
मंत्री पदाची वाटणी भाजपा शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात झाली आहे .पालकमंत्री पद कोणाला द्यायचे याच्यावरही फार्मूला ठरला असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आगामी सरकारमध्ये सर्व काही अलबेल असेल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

