मंचर (प्रतिनिधी)
आंबेगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने अनेक सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत. रीडिंग न घेता विज बिल देणे नादुरुस्त मीटर असताना त्याची दुरुस्ती न करणे .मीटर बदलून न देणे करणाऱ्या तक्रार करणाऱ्या ग्राहकाला नाहक त्रास देणे. वीजजोडणी मिळावी यासाठी अर्ज करून वीजजोडणी न देणे. एंजटा मार्फत कामे करणे.त्यामुळे आंबेगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या कारभाराला सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत.
स्थानिक अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. चुकीच्या आलेल्या बिलाची दुरुस्ती करून न देता ग्राहकाची वीज तोडणीकडे कंपनीचे कर्मचारी लक्ष देत आहेत.
विधानसभेच्या निवडणुका संपतात महावितरणचे कर्मचारी वीजजोडणी तोडण्याच्या मोडवर आले आहेत . गेल्या आठ दिवसात अनेक सर्वसामान्य नागरिकांची वीज कनेक्शन तोडले आहेत. अनेक कुटुंब त्यामुळे अंधारात दिवस काढत आहेत नवीन वीज जोडणी मिळावी म्हणून अनेक ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे मारूनही थकले आहेत
मीटर नादुरुस्त असताना पत्रकारांची वीजजोडणी तोडली कुटुंब अंधारात, पत्रकारांचा महावितरण वर आरोप
आंबेगाव तालुक्यात वीज वितरण चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे .मीटरमध्ये फॉल्ट असतानाही पंधरा हजार रुपये बील दिले गेले . बील दुरुस्त करून द्या बील भरतो अशी विनंती केली असता.बील दुरुस्त करुन न देता वीज बील भरले नाही…असे सांगत गावडेवाडी ता आंबेगाव येथील पत्रकार मधुकर गायकवाड यांची घरगुती वीजजोडणी शनिवारी (ता . ३० )रोजी संध्याकाळी सहा वाजता तोडण्यात आली आहे .
वारकरी सांप्रदायात असलेले हे कुटुंब आळंदी वारीवरुन घरी आले असता. त्यांच्या समोरच वीजजोडणी तोडली आहे. सदर कर्मचार्याला विनंती करुनही त्यांने गायकवाड यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.त्यामुळे या कुटुंबाला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. अंधारातच रात्र घालवावी लागली आहे.
गायकवाड कुटुंबाचा वीज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषणाचा इशारा
.मंचर येथील वीजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर व अवसरी खुर्द येथील कनिष्ठ अभियंता बी. एस ‘ शिंदे , गावडेवाडी येथील वायरमन यांना सदर वीज मीटर नादुरुस्त आहे.तो बदलुन द्या व वीज बील दुरुस्त करून द्या मी बील भरतो अशी विनंती करुनही बील दुरुस्त करून न देता.
वीजजोडणी तोडणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करुन सेवेतून बडतर्फ करावे अन्यथा वीज वितरण कंपनीच्या मंचर येथील कार्यालयाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा गायकवाड कुटुंबाने दिला आहे.
याबाबत वास्तव मराठीला गायकवाड यांनी दिलेली माहिती अशी की आठ नऊ महिन्यापूर्वी आधीचा वीज मीटर खराब असल्याने नवीन मीटर पत्रकार मधुकर गायकवाड यांना दिला मात्र हा नवीन मीटरही चुकीचे रीडिंग दाखवत आहे. ही गोष्ट अवसरी खुर्द येथील कनिष्ठ अभियंता बी. एस .शिंदे यांच्या कानावर घातली तेव्हा वायरमनला पाठवतो मीटर दुरुस्त करून देतो. असे सांगितले परंतु दर महिन्याला रिडींग न पडता बिल चालूच होते अंदाजे बिल चालूच होते

शनिवारी (ता ३० )दुपारी शिंदे यांनी गायकवाड यांना फोन करून सांगितले तुमचे आठ नऊ महिन्यांचे बिल थकले असून आम्ही तुमच्या घरगुती वीजपुरवठा तोडणार आहोत गायकवाड यांनी विनंती करूनही शिंदे यांनी ऐकले नाही.
मागील दोन महिन्यापूर्वी म टा मध्ये विरोधात बातमी छापली म्हणून स्थानिक वायरमनला सांगून शनिवारी संध्याकाळी सहा वाजता वीजपुरवठा खंडित केला .
शनिवार रविवार जोडून सुट्टी येत असल्याचे माहिती असूनही फक्त त्रास देण्याच्या हेतूने शिंदे यांनी हे कृत्य केले आहे. असा आरोप गायकवाड कुटुंबाचा आहे.गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता शांताराम बांगर यांचेशी संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल तर शिंदे यांनी तुम्हाला काय करायचे ते करा असे गायकवाड यांना सांगितले. या मुजोर अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी गायकवाड कुटुंबाने केली आहे
पिंपरखेड येथील विधवा महीलेला दोन वर्षे वीजजोडणीसाठी हेलपाटे मारुनही जोडणी मिळेना
पिंपरखेड ता शिरूर येथील एक विधवा महीलेने निरगुडसर व मंचर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वीजजोडणी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. दोन वेळा अर्ज देऊनही तो गहाळ झाला आहे. त्याबाबत त्या महीलेला समाधानकारक उत्तर मिळत नाही. आणि वीजजोडणीही मिळत नाही. अनेक वेळा रोजगार बुडवून ती या कार्यालयात गेली आहे. तीची कोणीच दखल घेत नसल्याने ही विधवा महीला मेटाकुटीला आली आहे.
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क नाही
या प्रकरणी मंचर येथील कार्यकारी अभियंता बांगर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
