फेंगल चक्रीवादळामुळे थंडी गायब पार १३ वरुन १८ वर..

Share

अमरावती (प्रतिनिधी)
फेंगल चक्रीवादळाची चाहुल लागताच अमरावती सह विदर्भात चार दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्यामुळे वातावरणात बदल झाला असुन पारा 13 वरून 18 वर पोहचला
आहे.

विदर्भात फेंगल चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आहे, त्यामुळे अमरावती जिल्ह्याचा पारा 13 अंशावरून 17 व 18 वर पोहोचला आहे त्यामुळे जिल्ह्यातून थंडी गायब झाली आहे.अमरावती सह विदर्भात ढगाळ वातावरण असल्याने काही ठिकाणी हलक्या व तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अमरावती सह विदर्भात तीन ते चार दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे,या प्रतिकूल वातावरणामुळे मात्र तूर व हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे तर थंडी जरी गायब असली तरी रोज व्यायाम करणाऱ्यांची संख्या मात्र कायम आहे,अमरावतीच्या वेलकम पॉईंट वर पहाटे उठून ज्येष्ठ नागरिक व्यायाम करताना दिसून आले

शेतीतील पिकांना फटका

फेंगल चक्रीवादळ येणार असल्याने रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार आहे. हरबरा तुर गहु पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या