अलीबाग समुद्र किनारी मारामारी, एकाचा मृत्यू -दोन जखमी, पाच व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

Share

रायगड (प्रतिनिधी)

रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनारी वाद होऊन शिवीगाळ करत मारामारी झाली.त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले आहेत. अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा आढावा घेतला व पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

अलिबाग समुद्र किनारी झालेल्या वादातून शिवीगाळ का करतो याची विचारणा केली असता वाद होऊन त्याचे रुपांतर मारामारीत झाले.

यामध्ये मितेश जनार्दन पाटील(राहणार -गडब, तालुका, पेण, रायगड) याचा मृत्यू झालाआहे.याबाबतची फिर्याद प्रथमेश राजेश पाटील(वय वर्षे, राहणार गडब, तालुका, पेण, रायगड) यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे..

ही फिर्याद ओमकार सुरेश भुकवार (साखर आक्षी, अलिबाग),विशाल विजयकुमार वंटे यांच्यासहित पाच जणांविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.
या मारामारीत प्रथमेश पाटील व ओमकार भुकवार हे दोघंही जखमी झाले आहेत. या पाच ही जणांना अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास अलीबाग पोलिस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या