एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे मोठे विधान

Share

जळगाव (प्रतिनिधी)

मुख्यमंत्रीपदाचा तोडगा निघत नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुलाबराव पाटील हेदेखील आज जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे आणि सरकारमध्ये सामील व्हावे, सरकारच्या बाहेर राहु नये असे मोठे विधान केले आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजुन अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे

एकनाथ शिंदे यांच्याकडून सत्ता स्थापनेला अडचण नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून जाहीर केले आहे की माझ्याकडून सत्ता स्थापनेला कोणतेही अडचण नाही. त्यामुळे त्यांच्या बाजूने मुख्यमंत्री पदाचा विषय संपलेला आहे. आगामी काळात शिवसेना पक्षाने सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. आगामी काळात शिवसेना पक्ष जो निर्णय घेईल,ते सर्व एकछत्री पद्धतीने एकनाथ शिंदे घेतील.

आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे ते आदेश देतात त्याच पद्धतीने आम्ही काम करतो. एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचे काम केले आहेत. त्यामुळे लोकांना ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावं हे वाटणं स्वाभाविक आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट सांगून टाकले आहे. याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मोदी शहा यांच्याकडेआहेत

ईव्हीएम मध्ये दोष नाही.

मी सहाव्यांदा निवडणूक लढवली त्यामुळे ज्या गावात मी मायनस राहील असे वाटत होते त्या गावात निकालानंतर बघितले, तर मी खरच मायनस होतो. विरोधकांकडून लहान मुलांप्रमाणे रडीचा डाव चाललेला आहे. निवडून आले तर ईव्हीएम चांगले आहे आणि पडले तर ईव्हीएम खराब आहे.

संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत

संजय राऊत हा माणूसच राहिलेला नाहीये.त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं पाहिजे. आधी त्यांनी शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे यांना संपवलं आणि आता स्वतःही संपेल. संजय राऊत मेंटल झालाय. त्याच्या हातात दगड द्या, दगड घेऊन भिवंडीच्या बाजारात फिर म्हणा

Related Articles

ताज्या बातम्या