धामणी येथील खंडोबा मंदिर परिसरात चंपाषष्ठी निमित्ताने विद्युत रोषणाई

Share

मंचर (प्रतिनिधी)
चंपाषष्ठीनिमित्त श्रीक्षेत्र धामणी ( तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरातील मुख्य शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे .या विद्युत रोषणाईमुळे पुरातन खंडोबा मंदिर व परिसर उजाळून निघाला आहे .

सोमवार (दिंनाक २ डिंसेबर) मार्गशिर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा मार्तंड भैरव देव दिपावलीच्या मुहर्तावर सखाराम महाराज संस्थान अमळनेर ( जिल्हा जळगांव) चे प्रमुख ह.भ. प. प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या उपस्थितीत चंपाषष्ठी नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली

यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी झालेली होती चंपाषष्ठी सोहळा शनिवार दिं.(७) डिंसेबर रोजी संपन्न होणार आहे . त्यानिमित्ताने खंडोबा मंदिर व शिखरावरील विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

धामणी परिसरात भक्तीमय वातावरणात

धामणी येथील खंडोबा मंदिर परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही चंपाषष्ठी महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण प्रसन्न व भक्तीमय झाले आहे. या महोत्सवाला पुणे मुंबई शहरातील भाविक उपस्थित राहत असल्याने धामणी ग्रामस्थांनी या महोत्सवाचे चांगले नियोजन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या