मुंबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्यातील दरेगाव गावी विश्रांती घेण्यासाठी गेले होते. तिकडेच ते आजारी पडले मग त्यांना बरे करण्यासाठी मुंबईमधुन आरोग्य यंत्रणा हलली मग शिंदेंना बरे वाटू लागले .नंतर ते ठाण्यात आले . पुन्हा आजारी पडले शिंदे आजारी पडल्याने महायुतीच्या सर्व बैठका रद्द झाल्या. शिवाय शिंदेंच्या शिवसेनेची बैठक रद्द झाली आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आणि ताप मात्र भाजपाला चढल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागली आहे .
साधेसुधे भोळे वाटणारे एकनाथ शिंदे यांनी मात्र महायुतीला बहुमत मिळाले असतानाही आपण कसे कसलेले राजकारणी आहोत..? हे दाखवून दिले आहे.
भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विरोधकांचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. झालेल्या या दारून-पराभवातून महाविकास आघाडी अजून सावरतच आहे. तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले आहेत.भाजपा महायुतीलाही चक्कर येऊ लागली असल्याची चर्चा आहे.
आजारपणाचे कारण जरी असले तरी एकनाथ शिंदे यांनी भाजपाला सत्तेत आणण्यासाठी घेतलेल्या कष्ट आपल्या राजकीय जीवनात घेतलेला मोठा निर्णय पहाता एकनाथ शिंदे यांना भाजपा सन्मान जनक राजकीय वजन देत नसण्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
अजित पवारांची सत्तेसाठी वाट्टेल ती भूमिका एकनाथ शिंदे यांची अडचण
2019 नंतर महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत सुरू होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री बनले होते.अगदी सहजतेने देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेणारे अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंबरोबरही रुजली होती.महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांच्याकडून शिवसेनेच्या आमदारांची कोंडी केल्याची चर्चा झाली.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्वभावाला न साजेशी भूमिका घेत भाजपासोबत जाणे पसंत केले .एकनाथ शिंदे यांनी ही भूमिका घेतल्याने भाजपा सत्तेत आली.अशी स्थिती असली तरी अजित पवारांना सत्तेची उब सुटली नाही. अजित पवारही एकनाथ शिंदे यांनी तयार केलेल्या सरकारमध्ये सहभागी झाले.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पद मिळवले. या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांनी कोणताही विरोध न करता अडीच वर्षे भाजपासोबत चांगले काम केले परिणामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला भरपुर यश मिळाले मिळाले .
एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी केली आहे का?
भाजपा महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे .एकनाथ शिंदेंच्या शिवसेने शिवाय महायुतीची सत्ता स्थापन होऊ शकते. अशी समीकरणे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे यांनी काय भूमिका घ्यायची ..?त्यांना कोणती मंत्रिपदे भेटणार..? याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेला वजनदार खाती मिळणार ..? की भाजपा देणार त्याच मंत्रीपदावर समाधान मानावे लागणार ..?अशी परिस्थिती सध्या राजकारणाची दिसत आहे
त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आजारपणातही राजकीय डाव टाकला आहे.आपला राजकीय अनुभव पणाला लावला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आजारी असले तरी ताप मात्र पुढच्या दोन दिवसात भाजपाला येईल अशी परिस्थिती तरी सध्या दिसत आहे.
