प्रतिबंधित माजांने एका व्यक्तीचा गळा चिरला

Share

यवतमाळ(प्रतिनिधी )

यवतमाळ शहरात प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा सर्रासपणे विक्री होत आहे. वाहनचालक वाहन चालवीत असताना तुटलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा गळ्याला गुंडाळल्याने एक व्यक्ती गंभीरित्या जखमी झाला आहे .ही घटना यवतमाळ शहरातील भोसा रोड परिसरात आज दुपारच्या सुमारास घडली आहे.

प्रशांत रामचंद्र राऊत असे गंभीर रित्या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्रशांत हे काही कामानिमित्त आपल्या दुचाकी वाहनाने रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजा गुंडाळल्याने ते रक्तबंबाळ होऊन गंभीरित्या जखमी झाले.

दरम्यान ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रशांत यांना यवतमाळ शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे .
प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रासपणे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात विक्री होत आहे. असे असतानाही पोलिसांची कारवाई कुठेही होताना दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे

Related Articles

ताज्या बातम्या