माझा बाबा सिद्दिकी होण्याआधी मला वाचवा-माजी आमदार रमेश कदम यांना कुख्यात टोळीकडून धमकी

Share

सोलापूर (प्रतिनिधी)

माझा बाबा सिद्धिकी होण्यापूर्वी मला पोलीस संरक्षण द्यावे, असे म्हणत धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांनी पोलिसात धाव घेतली आहे.

पुण्याच्या गुंडांच्या गँगने माझे अपहरण केले, माझ्याकडुन खंडणी वसूल केली आहे .आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे मला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी मोहोळ मतदार संघाचे माजी आमदार रमेश कदम यांनी केली आहे.

माजी आमदार रमेश कदम यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची आज भेट घेतली आपल्याला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे .यापुर्वीच माझे अपहरण करुन खंडणी वसुल केली आहे. माझी गुंडाकडुन हत्या करण्यात येणार आहे तशी ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

त्या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी फरार असल्याने आपल्या जीवितास धोका अआहे तात्काळ संरक्षण मिळावे. माझा बाबा सिद्धिकी होण्यापूर्वी मला संरक्षण मिळावे अशी मागणी माजी आमदार रमेश कदम यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

Byte : रमेश कदम (माजी आमदार, मोहोळ)

Related Articles

ताज्या बातम्या