मंचर प्रतिनिधी
शिरदाळे(ता आंबेगाव) येथील ग्रामपंचायत सरपंच पदी सुप्रिया मनोज तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सरपंच जयश्री संतोष तांबे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया शिरदाळे ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली.
या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी विश्वास शिंदे ग्रामसेवक अनिल टेमकर यांनी काम पाहिले मावळत्या सरपंच जयश्री तांबे यांनी नवनियुक्त सरपंच सुप्रिया तांबे यांचा सन्मान केला.
यावेळी उपसरपंच बिपीन चौधरी,माजी उपसरपंच मयुर सरडे,गणेश तांबे,तान्हाजी महाराज तांबे यांनी नवनियुक्त सरपंच यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सरपंच मनोज तांबे,माजी सरपंच वंदना तांबे,पोलीस पाटील कल्पना चौधरी,विजया चौधरी,माजी चेअरमन कांताराम तांबे,कोंडीभाऊ तांबे, राजेंद्र चौधरी,राघु रणपिसे,सोसायटी संचालक जयदीप चौधरी,शंकर दत्तात्रय तांबे,स्वप्नील दिलीप तांबे,स्वप्नील केरभाऊ तांबे,विठ्ठल तांबे ,
संजय तांबे,नानाभाऊ रणपिसे,प्रदीप चौधरी,बाळासाहेब चौधरी,बाळासाहेब रणपिसे,विक्रम तांबे,शंकर तांबे तसेच गणपत भांडारकर,शांताबाई चौधरी,स्वाती कोकणे उपस्थित होते.
यावेळी सरपंच म्हणून माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुप्रिया तांबे यांनी सांगितले.
