मंचर (प्रतिनिधी)
आंबेगावच्या पूर्व भागात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात सीएनजी पंप सुरू करण्याची मागणी पारगाव चे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे व निवृत्ती लोखंडे यांनी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आंबेगावच्या पूर्व भागातून बेल्हा जेजुरी व अष्टविनायक महामार्ग जात आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे. या परिसरात सीएनजी पंप नसल्याने वाहनधारकांची तसेच रिक्षा चालकांची गैरसोय होत आहे. पारगाव कारखाना परिसरात लवकरच सीएनजी पंप सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सदरचे निवेदन स्वीकारून लवकरच पारगाव कारखाना परिसरात सीएनजी पंप सुरू करण्या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
या परिसरातील अनेक वाहने ही सीएनजीवर चालणारी आहेत. सीएनजी पंप या परिसरात नसल्याने वाहनधारकांची मोठी कुंचबणा होत आहे. सीएनजी भरुन घेण्यासाठी वाहन चालकांना पूर्वेला शिरूर ४५ कि.मी व पश्चिमेला मंचर १८ कि.मी. नारायणगाव खेड येथील सी.एन.जी. पंपावर पंपावर जावे लागते आहे.त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत असल्याने कारखाना परिसरात तातडीने सीएनजी पंप उभारण्यात यावा, अशी मागणी निवृत्ती लोखंडे व सी.एन.जी. वाहन चालकांनी केली आहे.

