मंचर प्रतिनिधी
शिरदाळे (ता. आंबेगाव ) येथे वृक्षवल्ली आम्हा सोयरे व समस्त ग्रामस्थ शिरदाळे यांनी आयोजित केलेली एकदिवसीय क्रिकेट संपन्न झाली.अखंड हरिनाम सप्ताह व चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सात संघांनी सहभाग घेतला लीग पद्धतीने ही स्पर्धा पार पडली.
सर्व संघांना संघमालकांद्वारे संघ देऊन त्यांना प्रोफेशनल क्रिकेट किट देण्यात आले होते.या स्पर्धेचा विजेता ठरलेला संघ होता हर्बल युनिक राउंडर्स गावठाण या संघाचे संघमालक होते हर्बल ग्रुपचे सर्वेसर्वा बिपीन चौधरी आणि स्वप्नील केरभाऊ तांबे,उपविजेता ठरलेला संघ होता ऑक्सिनाईल वॉटर फायटर्स या संघाचे मालक होते ऑक्सिनाईल वॉटर फिल्टरचे मालक योगेश तांबे,तृतीय क्रमांक मिळवलेला संघ होता सागदरा सुपर जायंट या संघाचे संघमालक होते वाघेश्वर डेअरीचे मालक दत्ता रणपिसे तर समर्थ पेंट्सचे मालक देविदास रणपिसे,चतुर्थ क्रमांक मिळवला तो शिकोबा टायगर्स या संघाने या संघाचे मालक होते उद्योजक अशोक काचोळे हे चार संघ बक्षीस पात्र ठरले.
स्पर्धेत इतरही तीन संघ सहभागी होते.सप्तशृंगी फायटर्स या संघाचे संघमालक होते महेश चौधरी व स्वप्नील तांबे. बुरुंजवाडा सुपर किंग संघाचे संघमालक होते,अशोक महादू तांबे स्पर्धेमध्ये शेवटचा संघ होता तो वनदेव नाईट रायडर्स या संघाचे संघमालक होते विशाल तांबे आणि गणेश सखाराम तांबे. आशा या सातही संघांना संघमालकांनी स्पॉन्सर केले होते.
गावातील तरुण सहकाऱ्यांनी या स्पर्धेला रोख स्वरूपात बक्षीस म्हणून रोख रक्कम दिली. खूप दिवसांनी गावामध्ये सर्व तरुणांनी एकत्र येत ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गावातील लहान,तरुण वृद्ध एकत्र येऊन एकत्र हितगुज करताना दिसले .यातून गावचा एकोपा आणि गावचा उत्सव अधिक आनंददाई होण्यास मदत झाल्याची भावना शिरदाळे ग्रामस्थांनी व्यक्त केली
