राजगुरुनगर( प्रतिनिधी )
परभणी येथे संविधान प्रतीकृतीच्या झालेल्या विटंबनेचा व
त्यानंतर झालेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यावर प्रशासनाने केलेल्या भ्याड लाठीहल्ला व कोंबिंग ऑपरेशन विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला
वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष विक्रांत आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुका कार्याध्यक्ष दत्ता कांबळे युवा तालुका अध्यक्ष दत्ता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर येथे भव्य रास्ता रोको व निषेध सभा घेण्यात आली. परभणी येथील सरकार व पोलीस प्रशासन यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना दत्ता कांबळे सर्व नवनिर्वाचित आमदार व खासदार यांच्यावर प्रखर शब्दात टीका केली . काही आमदार
शपथ देताना जय भीम जय संविधान म्हणतात परंतु आत्ता मात्र सर्व मूग गिळून गप्प आहेत. परभणीच्या विषयावरती एकही आमदार खासदार बोलायला तयार नाही सर्व सत्ताधारी व विरोधकांच्या मुह मे राम बगल में सुरी ही वृत्ती आहे असे म्हणत जाहीर निषेध केला .
जिल्हा अध्यक्ष विक्रांत आल्हाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीयवादी असल्याची टीका करून मुख्यमंत्री यांना संविधान बदलून मनुस्मृती आणायची आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.व मुख्यमंत्री यांच्यावर कडक शब्दात टीका केली.
जिल्हा युवा उपाध्यक्ष रवींद्र रांधवे म्हणाले एकी नसल्याने हे भ्याड हल्ले होत आहेत एकत्र येऊन बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करा व एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले. खेड तालुका युवा अध्यक्ष दत्ता सोनवणे म्हणाले आम्ही रस्त्यावरती उतरतो त्यात आमचा स्वार्थ नाही तर आम्ही समाजासाठी काम करतो परंतु त्याला म्हणाव असा प्रतिसाद मिळत नाही खरंतर समाजाने हजारोनच्या संख्येने उपस्थित राहणे गरजेचे होते अशी खंत व्यक्त केली
उपाध्यक्ष दिनेश गोतारने काँग्रेसचे भास्कर तुळवे खेड पुतळा संवर्धन समितीचे अध्यक्ष अशोक कडलक यांनी आपल्या मनोगतातून जाहीर निषेध केला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरून रस्ता रोको करत परभणी येथे झालेल्या कृत्याचा जाहीर निषेध केला यावेळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
