भीमाशंकर कारखान्यावर ऊसतोड मजुरांसाठी आरोग्य शिबीर संपन्न

Share

मंचर प्रतिनिधी

दत्तात्रय नगर पारगाव ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊसतोड मजूर वाहतूक कामगार, महिला ,गरोदर महिला ,स्तनदा माता व त्यांच्या समवेत असणारी बालके यांच्यासाठी मंगळवारी (ता . १७ ) रोजी कारखाना स्थळावर आरोग्य विभाग पंचायत समिती आंबेगाव, जिल्हा परिषद पुणे प्राथमिक जिल्हा परिषद पुणे ,प्राथमिक केंद्र शिंगवे यांच्या विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आलेअसल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

या शिबिरामध्ये ऊसतोड, वाहतूक कामगार महिला यांची तपासणी करून त्यांना आजारानुसार गोळ्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे गरोदर महिला स्तनदा माता व त्यांच्या समवेत असणारी बालके यांची तपासणी करून त्यांना मोफत लसीकरण करण्यात आले. वाहतूक कामगार महिला यांच्या रक्ताचे नमुने घेऊन मोफत तपासणी करिता पाठवले आहेत . रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर त्यांना आजारानुसार औषधोपचार केले जाणार आहेत. महिला मजुरांना आरोग्याचे व स्वच्छतेच्या दृष्टीने संपूर्ण माहिती दिली असून सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले. आहे या शिबिरात १३४ महिला पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेतला

या शिबिरात शिंगवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ .रूबिना शेख शिरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारीडॉ सुहास मैड यांनी महिलांची व पुरुषांची तपासणी केली या शिबिराचा १३४ महिला व ऊसतोड पुरुषांनी लाभ घेतला.

Related Articles

ताज्या बातम्या