Connect with us

गावागावातुन

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Published

on

Share

नगर (प्रतिनिधी)
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात “सक्षम सार्वभौम नेतृत्व तयार करून परिचर्या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल करणे” या विषयावर २८ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषद विळद घाट येथे सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.

आरोग्य क्षेत्रामध्ये होणाऱ्या जलदगती बदलामुळे परिचारिका क्षेत्रामध्ये सार्वभौम, सशक्त व मजबुत नेतृत्याची आवश्यकता भासत आहे. परिचारिका क्षेत्रामध्ये काम करणाच्या नेतृत्वांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. आरोग्य क्षेत्रात होणाच्या बदलांचा परिणाम हा परिचारिका क्षेत्रातील नेतृत्वामध्ये बदल घडवून आणण्यास कारणीभूत आहे. आरोग्यसेवा प्रणालींचा दबाव तसेच आरोग्यसंदर्भातील जागतिक समस्याना सामोरे जाण्यासाठी परिचारिका क्षेत्रामध्ये सार्वभौम सक्षम असे नेतृत्व तयार होणे गरजेचे आहे जेणेकरून परिचारिका क्षेत्राचे भविष्य उज्वल होऊ शकेल. डॉ विखे पाटील परिचर्या महाविद्यालयाचे २० वर्षांपासून कुशल व गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू आहे, त्या निमीत्ताने महाविद्यालयात ” सक्षम सार्वभौम नेतृत्व तयार करून परिचर्या क्षेत्राने भविष्य उज्ज्वल करणे” या विषयावर ३ ऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर परिषदेकरिता डॉ पायपर, राहाय्यक प्राध्यापक ग्राउंड कॉलेज, संयुक्त राज्य अमेरिका (यू.एस.ए) या प्रमुख अतिथी असुन ‘परिचारिका क्षेत्रामध्ये परिपुर्ण क्षमतेचे नेतृत्व तयार करून परिचारीका सेवेचा दर्जा उंचावणे’ या विषयावर आपले मत मांडणार आहेत

डॉ. सर्वेश सुवरेश खन्ना, प्राध्यापक व संस्थापक, इमिरियट्स पेट्रोन, न्यूयॉर्क (अमेरिका) या ‘भविष्यातील नेतृत्व व परिचारिका क्षेत्रातील नेतृत्वाचे सक्षमीकरण करणे’ ह्या विषयावर व्याख्यान देणार आहेत, डॉ. नानसी डायस, सहाय्यक प्राध्यापक पश्चिम कॅरोलिना विद्यापीठ या अनुकरणीय सार्वभौम नेतृत्व तयार करून परिचर्या क्षेत्रात नेतृत्व उचावणे तसेच मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलच्या संचालक डॉ. फलाक्षी मांजरेकर या सशक्त नेतृत्व तयार करून परिचारीका क्षेत्राची उंची वाढविणे हे विषय माडणार आहेत.

तसेच परिचारीका क्षेत्रात नेतृत्वाचे भविष्य, आव्हान व संधी या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्राकरिता डॉ. शोभा गायकवाड, सहाय्यक प्राध्यापक एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई या नियंत्रक असतील. तसेच या चर्चासत्रामध्ये सौ. ग्रेसी मथाई, सी. ओ. बेबी मेमोरियल हॉस्पिटल केरळ, डॉ. नीलीमा सोनवणे, अतिरिक्त नर्सिंग संचालक, आरोग्य आयुक्तालय मुंबई, डॉ. अजिता नायर व्यवस्थापकीय संचालक आरोग्यसेवा व्यवस्थापन आणि डॉ. पर्ल क्रूज, लिड हिमॅटोलॉजी रिसर्चक्वीन एलिजाबेथ हॉस्पिटल आय. एन. एच. इंग्लड हे सर्व तज्ञ सहभागी होणार आहेत.

या परिषदेकरिता सुमारे ५२० शिक्षक, परिचारीका व विद्यार्थ्यांनी नोदणी केलेली असून शिक्षक व विद्यार्थी आपले शोध निबंध सादर करणार आहेत.

सदर परिषद यशस्वीरित्या पार पडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील सो, विश्वस्त मा. सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील तसेच विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

वाल्मीक कराड सापडला पण… मयत सरपंच संतोष देशमुख यांना मृत्यूनंतर ही न्याय मिळेल का?

Published

on

Share

पुणे प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण आणि समाजकारण दोन्हीही ढवळून निघाले आहे. पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्यापही देशमुख यांचे मारेकरी सापडले नाहीत. या मारेकरांचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला असताना आज वाल्मीक कराड सीआयडीकडे पुणे येथे हजर झाले आहेत

वाल्मीक कराड हेच मयत संतोष देशमुख यांचे मारेकरी आहेत का? जनता विचारते आहे? कारण आमदार सुरेश धस यांनी अप्रत्यक्षरीत्या वाल्मीक कराड यांच्यावरच आरोप केले आहेत. मात्र वाल्मीक कराड यांच्यावर पोलिस स्टेशनला फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

त्यामुळे संतोष देशमुख यांच्या खुनाशी संबंध नाही. असा बीडमधील एक मतप्रवाह आहे. तर दुसरा मतप्रवाह वाल्मीक कराड हेच या खुनाचे सूत्रधार आहेत .आणि त्यामुळेच ते पोलिसांपासून दूर पळत होते असा आहे .


आज वाल्मीक कराड यांनी पुणे शहरात सीआयडी कार्यालयात स्वतः आत्मसमर्पण केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गृह विभाग वाल्मीक कराड यांची कसून चौकशी करून संतोष देशमुख यांचे यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार आहेत का याचा शोध घेतील आणि वाल्मीक कराड यांच्यावर दाखल असलेली खंडणीचा गुन्हा याबाबतही चौकशी करून पोलीस वाल्मीकरांवर योग्य ती कारवाई करतीलच अशी अपेक्षा बाळगू या..


वाल्मीक कराड याला सापडणं पोलिसांना का शक्य झालं नाही??
*सरकारमधील काही मंत्र्यांनी वाल्मीक कराडला जाणीवपूर्वक पोलिसांपासून दूर ठेवले का?

*मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब न्यायालयात गेल्याने वाल्मीक कराड पोलिसात हजर झाला आहेत का?
*आणि संतोष देशमुख यांना मृत्यूनंतर ही न्याय मिळेल का? यावर या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढील काळात आपणाला वाटच पहावी लागेल…

Continue Reading

गावागावातुन

शरद पवार अजित पवार एकत्र येतील.. ?राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपेंनी घेतली शरद पवारांची भेट.

Published

on

Share

पुणे:प्रतिनिधी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे हे शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर चेतन तुपे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सगळ्या महाराष्ट्राची जी इच्छा आहे ते दोन्ही पवार करतील असे चेतन तुपे हे शरद पवार यांच्या भेटीनंतर बोलल्याने पुन्हा एकदा दोन्ही पवार एक होणार का ? ही चर्चा सुरू झाली आहे.

चेतन तुपे आज रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते, त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर चेतन तुपे म्हणाले साहेब आमच्या सर्वांचेच आहेत, साहेब आमच्या घरातील व्यक्ती असल्यासारखे आहेत कायम राजकारण हा विषय नसतो साहेबांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील विठ्ठल तुपे असतील किंवा अजित दादांचे नेतृत्वाखाली मी असेच शिकलो आहे.

की राजकारण हा केवळ एक महिन्यापुरता विषय असतो एवढा एक महिन्यापूर्वी राजकारण करायचं असतं आणि त्यानंतर विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकायचं असतं. त्यामुळे साहेबांची माझ्या वडिलांची आणि दादांची जी शिकवण आहे. त्यानुसार प्रत्येक गोष्टीत आम्ही राजकारण पाहत नाही तर दोन राष्ट्रवादी एकत्र यावेत हा निर्णय मोठ्या पातळी वरचा आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे दोन्ही पवार नेहमी सांगतात एकमेकांना भेटतात वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे ती ते करतील असे देखील तुपे म्हणाले आहे.

Continue Reading

गावागावातुन

वाल्मीक कराडचं शेवटचं लोकेशन सी.आय.डी च्या हाती

Published

on

Share

बीड: प्रतिनिधी

राज्यात खळबळ उडवणाऱ्या बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता महत्त्वाचे अपडेट पुढे आले आहे या प्रकरणात हत्येचा आरोप असलेला वाल्मीक कराड पुण्यात असल्याची माहिती आहे. वाल्मीक कराडच्या शोधात सीआयडी कडे महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले आहेत. तांत्रिक विश्लेषणात वाल्मीक कराडचं शेवटचं लोकेशन सीआयडी च्या हाती लागल आहे .

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फरार होण्यापूर्वी वाल्मीक कराड पुण्यात वास्तव्यास होता 17 डिसेंबरला वाल्मीक कराड याचे शेवटचे ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात दाखवल आहे. त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आहे. पुण्यात मोबाईल बंद करून तो फरार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीडच्या मस्साजोकचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे.

दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक न झाल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून घेरण्यात आला आहे, तसेच वाल्मीक कराडचा मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचा संबंध असल्यामुळे त्यांना ही लक्ष्य करण्यात येत आहे. वाल्मीक कराड हा परळी नगर परिषदेचा माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष माजी गटनेता आहे. तो मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी कराड सांभाळत असल्याचं सांगितलं जात आहे .

वाल्मीक कराड याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच वाल्मीक कराडचे अनेक नेत्यांबरोबरही फोटो आहेत ज्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरदचंद्र पवार यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे केज पोलीस ठाण्यात कराड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continue Reading
Advertisement

Trending