आंबेगाव तालुक्यात निरगुडसर येथील वळसेमळा येथे बिबट्या झाला जेरबंद.

Share

वळती प्रतिनिधी

निरगुडसर येथील वळसे मळ्यात ३ दिवसापूर्वी लावलेल्या वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.

पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला असावा असे हरीभाऊ वळसे या स्थानिक नागरिकांनी सांगितले. पकडलेला बिबट्या हा एक वर्षाचा नर असून तो जास्त आक्रमक दिसून येत आहे.

त्याने पिंजऱ्याला वारंवार धडका दिल्यामुळे त्याच्या नाकाला किरकोळ जखम झाली होती बिबट्या जेरबंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.असे असले तरी या परिसरात बिबट्याची संख्या मोठी असल्याने वनविभागाने इतर बिबट्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वळसेमळा शिवारातील हरीभाऊ गेनभाऊ वळसे यांच्या शेतात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. परंतु, तो हुलकावणी देत होता. अखेरीस शुक्रवारी पाहटेच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

सोमवारी सकाळी सहा वाजता हरीभाऊ वळसे यांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क केले असता वनपाल प्रदिप कासारे, वनरक्षक अश्विनी डपळ रेस्क्यू टीम मेंबर यांनी धाव घेत पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. या वेळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. प्रसंगावधान राखत वन पाल प्रदिप कासारे यांनी पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात दाखल केले आहे.

आंबेगाव तालुक्यात येथे सर्वत्र ऊसाचे बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून ऊस तोड झाले मुळे बिबट्याचे लोकवस्तीवर वावर देखील वाढल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी.

पुजा वळसे
राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षा (शरद पवार गट)

Related Articles

ताज्या बातम्या