मंचर प्रतिनिधी
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री गडदादेवी यात्रा उत्साहात संपन्न झाली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत एकुण ३५० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. पहिल्या दिवशी फळीफोड बैलगाडा सुवर्णयुग बैलगाडा संघटना निरगुडसर हा ठरला तर दुसऱ्या दिवशी सरपंच ग्रुप बैलगाडा संघटना खडकवाडी हा बैलगाडा फळीफोड झाला . तर घाटाचा राजा कचरू भिकाजी दौंड पोंदेवाडी यांनी पटकावला.
वडजादेवी उत्सवानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या
आखाड्यात संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या मल्लांनी चितपट कुस्त्या करून शौकिनांची मने जिंकली. विजेत्या पहिलवांना एकूण ५५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. सदर कुस्तीसाठी पुणे अहिल्यानगर नाशिक येथील पैलवांनी कुस्तीसाठी हजेरी लावली होती.
यावेळी पंच म्हणून पै. पंच पाबळे राजेंद्र पाबळे अनिल वाळुंज जयसिंग पोंदे सुशांत रोडे निखिल पोंदे महिंद्र पोखरकर संदीप पोखरकर अशोक दुगड यांनी पाहिले तर यात्रेची व्यवस्था अशोक वाळुंज राहुल घोलप प्रवीण पडवळ आनंदा पोंदे सदाशिव रोडे पोपट रोडे संतोष वाळुंज नानाभाऊ पोखरकर अमोल वाळुंज अर्जुन महाराज वाळुंज सुनिल घोलप चंद्रकांत विरकर यांनी पाहिली.
