मंचर प्रतिनिधी
नागापूर ( ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील रोहन शिवशंकर पोहकर यांची
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवले आहे. त्याची महसूल सहाय्यक पदी त्याची निवड झाली. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
रोहनचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा नागापूर, माध्यमिक शिक्षण रांजणी येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण मंचर येथे झाले. नंतर रोहनने पुण्यातील नामांकित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले २०२० च्या लॉकडाऊन कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दरोरोज दहा ते बारा तास अभ्यास केला. गेली पाच वर्षे पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता चौथ्या प्रयत्नात यश मिळवले आहे.
आई-वडिलांचे भावाचे अधिकारी होण्याचे स्वप्न रोहनने पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असताना त्याने आपल्या वडिलांना शेतीकामात हातभार लावत अभ्यास केला.
रोहन सत्काराला उत्तर देताना म्हणाला की, मला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना एकच सांगायचे आहे की ध्येय, जिद्द, अभ्यास या त्रिसूत्रीने प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते.
रोहनच्या यशाबद्दल रोहनच्या मित्र परिवार व नागापूर ग्रामस्थांनी रोहनची नागापुर गावातून मिरवणूक काढली होती.
यावेळी भिमाशकर सहकारी साखर कारखाना चेअरमन बाळासाहेब बेडे,शरद सहकारी बँकचे उपाध्यक्ष विवेक वळसे,
भिमाशकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बाबासाहेब खालकर,शरद सहकारी बँकचे संचालक शिवाजी लोढे,रमेश खिलारी, नागापूर सरपंच गणेश यादव, शिंगवे पोलीस पाटील गणेश पंडीत, पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे,व नागापुर ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच सुनील शिंदे यांनी केले तर आभार शिवशंकर पोहकर यांनी मानले
मी माझ्या मुलांना एकच सांगायचो की खूप शिकुन नोकरीला लागा कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मी शेती करतो शेतीत खूप खूप कष्ट करावे लागतात. त्याच बरोबर नैसर्गिक संकट येतात शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामूळे मुलांनी शिकावे व मोठे अधिकारी व्हावें ही इच्छा होती आणि ती मुलाने पूर्ण केली आहे.
शिवशंकर पोहकर ( रोहनचे वडील )
