जारकरवाडीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Share

मंचर

जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील जि.प. शाळेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. आदर्श प्रशासक, न्यायी शासक आणि धार्मिक महिला म्हणून इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव नोंदवणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांची जयंती दरवर्षी 31 मे रोजी साजरी केली जाते. यंदा अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती साजरी केली जात आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेचे संचालक खंडू भोजने, शरद पतसंस्थेचे संचालक रवींद्र काकडे, शालेय समितीचे अध्यक्ष माधुरी वैद, उपाध्यक्ष प्रशांत लबडे, माजी उपसरपंच अशोक भोजणे, महादुअप्पा लबडे,आनंदा भोजने, शिवाजी भोजने, विलास भोजने, गणेश भोजने, अशोक देवडे, महेश लबडे, मुख्यध्यापक काळे सर व सहशिक्षक विद्यार्थी उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या