मंचर लोणी रस्ता खड्ड्यात

Share

मंचर

आंबेगाव तालुक्यातील मंचर लोणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्ता खड्ड्यात का खड्डा रस्त्यात असा प्रश्न प्रवासी वाहन चालकांना पडला आहे. मान्सून पूर्व पावसाने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे अवसरी खुर्द, अवसरी बु!! मेंगडेवाडी, जारकरवाडी, धामणी, लोणी आदी गावातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो. नागरिकांचा नाहक बळी जातो. तरीही प्रशासन ढिम्म असते. आता तर पावसाला सुरुवात झाली आहे.


पावसाचे पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे.
त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे डांबरही निघाले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम दर वेळेस करण्यात येते, आणि प्रत्येकवेळी रस्ते पुन्हा नादुरुस्त होतात.


या मार्गावरून जड वाहनांची नेहमीच ये-जा सुरू असल्याने डांबर उखडून खड्डे निर्माण होत आहेत. या मार्गाने माल वाहून नेणारे ट्रक सतत जात असतात. मात्र निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्योन रस्ते सतत उखडतात आणि खड्डे तयार होतात. त्यामुळे प्रवासी वाहनचालकांना रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने त्यांना आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जारकरवाडी सरपंच प्रतिक्षा बढेकर, उपसरपंच सुवर्णा भांड, कौसल्या भोजने, सचिन टाव्हरे सामाजिक कार्यकर्ते सुरेश भोजने यांनी केली आहे

Related Articles

ताज्या बातम्या