धामणीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा उपक्रम

Share


धामणी (ता. आंबेगाव जि पुणे) :
येथील उद्योजक मंगेश नवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भाऊसाहेब करंडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून दहावी व बारावी परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून एक अनोखी परंपरा सुरू केली आहे.

दहावी आणि बारावी परीक्षांतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे –

इयत्ता दहावी:

प्रथम क्रमांक: वैष्णवी निवृत्ती भागवत – ९५.२०%

द्वितीय क्रमांक: सायली संतोष विधाटे – ९३.८०%

तृतीय क्रमांक: सायली राजेश गवंडी – ८५%

इयत्ता बारावी:

प्रथम क्रमांक: संस्कृती योगेश जाधव – ६५.६४%

द्वितीय क्रमांक: सायली विश्वास सुर्वे – ६४.३३%

तृतीय क्रमांक: साक्षी रामदास विधाटे – ६४%

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

या वेळी संतोष पंचरास, महेश वाघ, संकेत वायकर, प्रतीक जाधव, सरपंच रेश्मा बोर्हाडे, शिवसेना शाखाप्रमुख विशाल बोर्हाडे, गोपाळ रोडे आदींनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये शालेय समिती अध्यक्ष भाऊसाहेब कदम, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष चेतन रोडे, शिरदाळेचे सरपंच मयूर सरडे, पोलीस पाटील सुरज जाधव, संजय जाधव, अक्षय रोडे, पै. रोहन जाधव यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर सरडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब करंडे यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या