मंचर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बांधकाम मजूर नोंदणी केलेल्या मंजुरांनी आपल्या पाल्याला शिष्यवृत्ती मिळावी म्हणून अर्ज शासन दरबारी दाखल केले होते त्यानंतर अनेक पाल्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे .मात्र काही एजंटांनी संबंधित शासकीय कार्यालयात वशिला लावून विद्यार्थ्यांची यादी मिळवली. आणि त्यांच्या पालकांना गाठून तुम्हाला आमच्यामुळे शिष्यवृत्ती मिळाली आहे . असे सांगुन त्याच्यातील काही रक्कम बांधकाम मजूराकडुन घेतली असल्याची चर्चा सर्वच गावांमध्ये जोरदारपणे सुरू आहे.
या बांधकाम कामगारांची शिष्यवृत्ती लुटणाऱ्या एजंटांची चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे

जुन्नर तालुक्यात बांधकाम मजूर नोंदणी मेळाव्यामध्ये पत्रकार सचिन तोडकर यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर अनेक बांधकाम मजुरांना फसवणाऱ्या एजंटांचे भांडाफोड होत आहे . त्यामुळे बांधकाम मजूर नोंदणी केलेल्या आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या बांधकाम मजुरांकडून त्यांना खोटे सांगून आम्ही तुम्हाला शिष्यवृत्ती मंजूर करून दिली असे फसवले जाते आहे. ही शासनाची योजना असून शासनाने संबंधित बांधकाम मजुरांना त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात जमा केली असतानाही बिंदास्तपणे काही एजंट या पालकांची फसवणूक करून या शिष्यवृत्ती मधील काही रक्कम आपणाकडे घेत आहेत. ही बाब गंभीर असून याची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी अशी मागणी होत आहे.
विशेष म्हणजे बांधकाम मजुरांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळाल्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळणारे एजंटच काही ठिकाणी बांधकाम मजूर नोंदणी करताना एंजटापासुन सावध रहा असे आवाहन करत आहेत. आणि आम्ही एजंट नाही आम्ही कोणतीही आर्थिक लूट केली नसल्याचा आव आणत सामाजिक कार्यकर्ते असल्याच्या आविर्भावात मिरवत आहेत.
फसवणूक झालेल्या बांधकाम मजुरांना तक्रारीची सोय उपलब्ध करून द्यावी
बांधकाम मजूर योजनेमध्ये शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर फसवणूक झालेल्या बांधकाम मजुरांना शासनाने तक्रारीची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार गोरगरिबांसाठी नवनवीन योजना राबवत आहे. मात्र त्यावर एजंटच डल्ला तर मारत तर नाहीत ना..? अशी चर्चा खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यामध्ये आता जोर धरत आहे.
