मंचर
पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथे खरीप पूर्व हंगाम शेतकरी मेळावा
( दि. 12 ) रोजी संपन्न झाला. कृषी संकल्प अभियान अंतर्गत खरीप हंगाम पिक नियोजन व शेतकरी मेळावा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यावेळी खरीप हंगाम पीक नियोजन व प्रमुख पीक व भाजीपाला पिक विषयक मार्गदर्शन, माती परीक्षण व खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन बायोचार विषयक मार्गदर्शन के व्ही के नारायणगावचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे सर , राष्ट्रीय द्राक्ष अनु साधन केंद्राच्या शास्त्रज्ञ कविता मॅडम यांनी केले.

तसेच महात्मा गांधी रोगार हमी योजना, अग्रोस्टिक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढणे, पी एम किसान, आणि इतर कृषी विषयक योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी प्रसन्न जाधव यांनी दिली. यावेळी मा. सरपंच संदीप पोखरकर, महेंद्र पोखरकर कृषिविभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी शेळके निशा व गावांतील शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
