वाढदिवसाचा खर्च टाळून जारकरवाडीत गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

Share

मंचर

जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात आठवी, नववी, दहावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या गरिब व होतकरू विद्यार्थ्याला उद्योजक हनुमंत काकडे यांच्या संकल्पनेतून सचिन अर्जुन लबडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तीन विद्यार्थ्यांना वर्षभरात लागणारे शालेय साहित्य शैक्षणिक फी, शालेय गणवेश मोफत वाटप करण्यात आल्याचे हनुमंत काकडे व सचिन लबडे यांनी सांगितले.

त्यांच्या या उपक्रमाचे जारकरवाडी परिसरात कौतुक होत आहे. अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी किंवा पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त होते. पैसे अभावी गरीब गरजू विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन शालेय विद्यार्थ्यांना मदत केल्याचे सचिन लबडे यांनी सांगितले.

यावेळी माजी चेअरमन शिवाजी भोजने, माजी उपसरपंच शरद भोजने, शरद पतसंस्थेचे संचालक रवींद्र काकडे, डॉ महादु भोजने, ग्रा पं.सदस्य सुरेश मंचरे, बाबाजी देवडे , नवनाथ जारकड, पोपट लोले, आनंदा भोजने, योगीत लबडे, प्रशांत लबडे, सचिन लबडे शालेय विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेंगाळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोमीन सर यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या