आंबेगाव तालुक्यातील लुंबिनी बुद्ध विहार ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष, तसेच आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते जगन्नाथ शिवराम अंकुश (वय ६९) यांचे गुरुवार दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ, बौद्ध समाज आणि सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
जगन्नाथ अंकुश यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर कार्य केले. समाजातील शोषित, वंचित व दुर्लक्षित घटकांच्या न्याय आणि हक्कांसाठी ते नेहमीच आघाडीवर राहिले. त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बुद्ध विहार उभारणी, सामाजिक एकजूट, शिक्षणाचा प्रसार आणि बौद्ध समाजात जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर दिला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा, प्रखर स्वाभिमान आणि समाजाची तळमळ दिसून येत असे.
त्यांचा जलदान विधी व पुण्यानुमोदन रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. तिरपाड माळीन फाटा, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे संपन्न होणार आहे.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अमोल अंकुश यांचे ते वडील होते
या दुःखद प्रसंगी लुंबिनी बुद्ध विहार ट्रस्ट भिमाशंकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आंबेगाव तालुका, अनुसूचित जाति बचाव कृती समिती आंबेगाव व परिवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी जगन्नाथ अंकुश यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.
