मंचर (प्रतिनिधी)
मेंगडेवाडी ता आंबेगाव जिल्हा पुणे येथे श्री गण्या डोंगर येथे वटवृक्ष मेंगडेवाडी फाउंडेशन तर्फे करत असलेल्या वृक्षारोपण उपक्रमांमध्ये सेरेन्स सर्व्हिसेस इंडिया एल एल पी पुणे या हिंजवडी येथील मल्टिनेशनल आय टी कंपनीतील सर्व स्टाफने मेंगडेवाडी येथे येऊन विविध १५ प्रकारच्या १३१ रोपांचे वृक्षारोपण केले

या कार्यक्रमाला सेरेन्स सर्व्हिसेस इंडिया एल एल पी पुणे या कंपनीचे संचालक नितीन दमामे, चिराग जाधव व कंपनीचा पूर्ण कर्मचारी वर्ग तसेच मेंगडेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब सावळेराम मेंगडे व वटवृक्ष मेंगडेवाडी फाउंडेशनचे सर्व सभासद उपस्थित उपस्थित होते.
वटवृक्ष मेंगडेवाडी फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक करत आम्हाला भविष्य काळात या ठिकाणी वृक्षारोपण करायला आवडेल तसेच वटवृक्ष मेंगडेवाडी फाउंडेशनतर्फे कोरोना लॉकडाउन पासून मागील ५ वर्षात वृक्षारोपण केलेल्या रोपांचे मोठ्या वृक्षांमध्ये झालेले रूपांतर पाहून भारावून गेलो असे मत सेरेन्स सर्व्हिसेस इंडिया च्या संचालकांनी यांनी व्यक्त केले.. मागील ५ वर्षात सुमारे ४० पेक्षा जास्त विविध प्रकारच्या ३००० रोपांचे संगोपन श्री गण्या डोंगर येथे करण्यात आले आहे..यावेळेस वटवृक्ष मेंगडेवाडी फाऊंडेशनचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
