पोंदेवाडी गाव धामणी प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट करावे , पोंदेवाडी ग्रामस्थांची मागणी

Share

मंचर : प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावाला आरोग्य सेवेसाठी शिंगवे प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट करण्यात आले असून यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. अनेक वर्षांपासून पोंदेवाडी गावाला जवळच्या धामणी प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य सेवा पुरवली जात होती.

धामणी हे पोंदेवाडीपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असल्याने गावकऱ्यांना तिथे जाणे सोयीचे आहे. मात्र शिंगवे गाव साधारण सहा किलोमीटर अंतरावर असून त्यासाठी आडमार्गाने जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थांना वेळेवर उपचार घेणे कठीण जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पोंदेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाने आंबेगाव तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. “ पोंदेवाडी गावाचा धामणी प्राथमिक आरोग्य केंद्रात समावेश करून पूर्वीप्रमाणे आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी माजी सरपंच अनिल वाळुंज व पोंदेवाडी ग्रामस्थांची निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या