इंदुमती विठ्ठल दरेकर यांचे निधन घोडेगावातील उद्योजक दरेकर कुटुंबियावर शोककळा

Share

घोडेगाव प्रतिनिधी

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बाळकृष्ण दरेकर यांच्या पत्नी कै इंदुमती विठ्ठल दरेकर (वय ७८) यांचे रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

कै. इंदुमतीबाई दरेकर या आपल्या साध्या, शांत व सर्वांना आपुलकीने जपणाऱ्या स्वभावामुळे परिसरात प्रिय होत्या. त्यांच्या निधनाने दरेकर कुटुंबासह घोडेगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात उद्योजक अविनाश दरेकर, निलेश दरेकर, संतोष दरेकर, ज्येष्ठ पत्रकार गिरीश दरेकर अशी तीन मुले व तीन मुली नातु सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी घोडनदीच्या पवित्र तीरावर घोडेगाव येथे होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या