मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे बिरोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापनेपासून ते विजयादशमी या कालावधीत नवरात्रोत्सव काळात महाराष्ट्रातील नामवंत प्रबोधनपर कीर्तने संपन्न झाली. विजया दशमीच्या दिवशी गंगेचे पाणी, पाण्याची मिरवणूक, महाआरती, काठीची मिरवणूक संपन्न झाली. संध्याकाळी बिरोबाचे पुजारी गणपत मंचरे यांच्या हस्ते भंडाऱ्याची उधळण करत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला.

नवरात्रोत्सव कार्यकाळात दुध संघाचे माजी संचालक दौलत लोखंडे, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक रमेश लबडे, पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, जारकरवाडी सरपंच प्रतिक्षा बढेकर, उपसंरपंच सचिन टाव्हरे, कौसल्या भोजने, सुरेखा निघोट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरण वाळुंज, उद्योजक दत्ताराम वैद, चेअरमन खंडु भोजणे, उद्योजक रामहरी देवडे, आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्षा पुजा वळसे पाटील, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षा रुपाली भोजने आदी मान्यवरांनी नवरात्रोत्सवाला भेटी दिल्या. दसऱ्याच्या दिवशी रात्री आठ नंतर मयुर सरडे व प्रतीक्षा भांड यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला
कार्यकमाची व्यवस्था नवनाथ मंचरे, अविनाश तागड दिपक पाचपुते कचरदास भोजणे,रविंद्र भांड,मंगेश भोसले, सत्यवान भोसले,अविनाश पवार, एकनाथ मच्छिंद्र भांड, गोरक्षनाथ भांड, पोपट भोजणे, उत्तम मंचरे व गावातील तरूणांनी पाहिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्ती भांड, प्रतिक्षा भांड भागाजी भांड यांनी केले.
