गावागावातुन
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप

लोणी धामणी प्रतिनिधी-राजु देवडे
पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना. दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनानुसार सभासद व ऊस उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली निमित्त गाव व गटवार साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले असुन. त्यानुसार सोमवार दि. ७ ऑक्टोबर ते बुधवार दि. १६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत रु. २०/- प्रति किलो दराने गावोगावी साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
सभासद व ऊस उत्पादकांना भविष्याचा विचार व आधुनिक प्रणालीचा वापर करून स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले आहे. नियोजीत साखर वाटप तारखेला फक्त स्मार्ट कार्डद्वारेच साखर वाटप करण्यात येणार असल्याने सभासद व ऊस उत्पादकांनी दिलेली स्मार्ट कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. चालू वर्षी साखरेचे वाटप कारखान्याचे भागधारक व गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस पुरविलेला आहे यांचेसाठी राहील. त्यामध्ये (१) पुर्ण भागधारक (रु. १०,०००/-) व ऊस उत्पादक – ८० किलो (२) फक्त भागधारक अथवा फक्त ऊस उत्पादक – ६० किलो (३) अपुर्ण भागधारक व ऊस नाही – ५० किलो याप्रमाणे खालील तारखेनुसार विभागीय शेतकी गटांतर्गत गावोगावी १०, २० व ५० किलो पॅकींगमध्ये साखर वाटपाचे नियोजन केलेले आहे.
- सोमवार दि. ७ – पारगाव गटातील गावे,
- मंगळवार दि. ८ – पारगाव गाव, निरगुडसर व जांबूत गटातील गावे,
- बुधवार दि. ९ – निरगुडसर व पिंपरखेड गाव, कळंब व रांजणी गटातील गावे,
- गुरुवार दि. १० – मंचर गटातील गावे,
- शुक्रवार दि. ११ – मंचर व अवसरी खुर्द गाव व घोडेगाव गटातील गावे,
- रविवार दि. १३ – टाकळी हाजी व कवठे गटातील गावे,
- सोमवार दि. १४ – टाकळी हाजी व कवठे गाव, करंदी, जातेगाव गटातील गावे,
- मंगळवार दि. १५ – करंदी व जातेगाव गाव, भोरवाडी, निमगाव सावा,
नारायणगाव, ओझर गटातील गावे, - बुधवार दि. १६ – भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव गटातील गावे,
जे सभासद / ऊस उत्पादक वरील नियोजीत कालावधीत आपआपले गावामधून साखर घेवू शकणार नाहीत त्यांना साखर शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर ते बुधवार दि. ३० ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वाटप केली जाणार आहे. त्याशिवाय राहिलेल्या सभासद व ऊस उत्पादकांना सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक महिन्याचे पहिल्या शनिवारी कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखर वाटप करण्यात येणार आहे. गर्दी कमी करण्यासाठी गावोगावी साखर वाटपाचे प्रमाण विचारात घेवून काही गावांमध्ये सलग २ दिवस वाटपाचे नियोजन केले असून सभासद व ऊस उत्पादकांनी साखर घेवून जाणेचे सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
गावागावातुन
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्षपदी विशाल वाबळे

मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी खडकी ( ता. आंबेगाव) येथील विशाल वाबळे यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद गोतारणे यांनी हे निवडीचे पत्र विशाल वाबळे यांना दिले .मंचर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मेळाव्यात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, युवक अध्यक्ष प्रमोद सिंह गोतारणे, दामु घोडे व आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर निवडीचे पत्र दिले आहे.

यावेळी सत्काराला उत्तर देताना विशाल वाबळे म्हटले की आंबेगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देवुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम मी करणार आहे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोहचवणार असल्याचे विशाल वाबळे यांनी निवडीनंतर सांगितले.
विशाल वाबळे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ अमोल कोल्हेच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासोबत ते सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतात . विशाल वाबळे यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरात उन अभिनंदन होत आहे.
गावागावातुन
पारगावच महसूल कार्यालय मोजतोय अखेरच्या घटका

मंचर
आंबेगाव च्या पूर्व भागातील पारगाव कारखाना येथील तलाठी व महसूल मंडलाधिकारी कार्यालय शेवटच्या घटका मोजत आहे. दोन्ही कार्यालयाची इमारत नादुरुस्त झाल्याने पारगाव जारकरवाडी तलाठी कार्यालय पारगाव ग्रामपंचायत खोलीमध्ये चालू आहे तर महसूल मंडलाधिकारी कार्यालय खाजगी जागेत चालू आहे. पूर्वीची इमारत चाळीस वर्षाहून अधिक झाली आहे. सदर इमारत जीर्ण स्वरूपाची झाली असून कौलारु इमारत आहे. या इमारतीला तडे गेले असून धोकादायक बनली आहे .
तलाठी सजेसाठी पारगाव जारकरवाडी ही गावे असून महसूल मंडलाधिकारी कार्यालयसाठी एकुण सतरा गावे आहेत त्यामध्ये पारगाव, जारकरवाडी, शिंगवे, वळती, भागडी, काठापूर बुद्रुक, लाखणगाव, पोंदेवाडी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी, खडकवाडी, रानमळा, वाळुंज नगर. ही गावे येत असल्याचे माहिती मिळत आहे. सदर इमारतीचे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी पोंदेवाडीचे माजी सरपंच अनिल वाळुंज व जारकरवाडीचे उपसरपंच सचिन टाव्हरे यांनी केली आहे.
गावागावातुन
वळती : काटवानवस्तीत घरफोडी; एक लाख रुपये व सोन्या-चांदीचे दागिने चोरीला

वळती, ता. २८
वळती येथील काटवानवस्तीत शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे एक लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.ही घटना नकुबाई जयराम भोर (वय ८५) यांच्या घरी घडली असून त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने आपल्या धाकट्या मुलाच्या घरी राहण्यास गेल्या होत्या.
घटनेचा तपशील असा आहे की, वळती गावाच्या पूर्वेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या काटवनवस्तीत नकुबाई भोर यांचे घर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेतीचा खंड शेतकऱ्याने दिला होता. तो खंड रक्कम (रु. १,००,०००) नकुबाई भोर यांनी कपाटात ठेवला होता.
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रामहरी कोंडीभाऊ भोर व बबन जयराम भोर यांच्या घरांना बाहेरून कडी लावून टाकली. त्यानंतर नकुबाई भोर यांच्या घराचे कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून एक लाख रुपये रोख, पाकिटातील १५०० रुपये, तसेच दीड तोळ्याची सोन्याची बोरमाळ, अर्धा तोळ्याची नथ, तीन तोळ्यांच्या चांदीच्या मासोळ्या असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
शनिवारी सकाळी सहा वाजता बबन भोर यांनी शेजारील शेतकरी रामहरी भोर यांना फोन करून घराच्या कडी उघडण्यास सांगितले. मात्र त्यांच्या घरालाही कडी लावलेली असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ गोविंद भोर यांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वळती गावाचे पोलीस पाटील प्रकाश लोंढे यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानंतर सहायक फौजदार एस. आर. मांडवे, पोलीस कॉन्स्टेबल पी. एस. गवारी व मोमीन यांनी घटनास्थळी भेट देऊन घरफोडीचा पंचनामा केला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
-
गावागावातुन9 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन12 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक7 months ago
देवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन12 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक4 months ago
शेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
मनोरंजन2 years ago
शिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन12 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर