Connect with us

गावागावातुन

भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर

Published

on

Share

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२२-२३ करीता “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर झाला आहे. देशातील २०२२-२३ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची मंगळवारी घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


“देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” प्राप्त झाल्याबाबत माहिती देताना श्री. बाळासाहेब बेंडे म्हणाले की, पुरस्कारांचे मुल्यांकन करण्यासाठी ११ सदस्यांच्या तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यात केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्याशिवाय मुख्य संचालक, राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ नवी दिल्ली, उप संचालक (साखर) नवी दिल्ली, संचालक राष्ट्रीय साखर संस्था, कानपुर, महासंचालक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, गुजरात, तामिळनाडू या राज्यांच्या साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथे ऑगस्टमध्ये होणार आहे.


महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.


कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” ६ वेळा मिळविणारा देशातील पहिला साखर कारखाना आहे. अशी माहिती व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे मा. संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

मंत्रीपदावर मी समाधानी , जलसंपदा विभागाच्या माध्यमातून बाळासाहेब विखेपाटील यांचे स्वप्न पूर्ण करणार-मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

अहिल्‍यानगर दि.२३ प्रतिनिधी

   मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्‍या अतिशय महत्‍वाच्‍या खात्‍याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स्‍व.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खो-यात आणण्‍याचे स्‍वप्‍न या निमित्‍ताने पुर्ण करण्‍याची संधी मिळाली असल्‍याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

   मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्‍यानंतर ना.विखे पाटील यांचे अहिल्‍यानगर येथे प्रथमच आगमन झाले. डॉ.विखे पाटील फौंडेशन येथे जेष्‍ठ समाजसेवक पद्मविभूषण आण्‍णासाहेब हजारे यांचे आशिर्वाद घेतले. त्‍यांनी केलेल्‍या सत्‍काराचाही स्विकार केला. आ.शिवाजीराव कर्डीले, आ.‍काशिनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मा.आ.अरुणकाका जगताप, नाशिक विभागाचे आयुक्‍त डॉ.प्रविण गेडाम, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, जिल्‍हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर आदिंनी त्‍यांचे स्‍वागत केले.

   माध्‍यमांशी बोलताना ना.राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, राज्‍य मंत्रीमंडळात जलसंपदा विभागाची मिळालेली जबाबदारी ही काम करण्‍याची एक संधी असून, विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेल्‍या जबाबदारीतून स्‍व.बाळासाहेब विखे पाटील यांचे स्‍वप्‍न पुर्ण करण्‍याचे दायित्‍व मुख्‍यमंत्र्यांनी माझ्यावर सोपविले आहे. ती जबाबदारी निश्चितपणे यशस्‍वी करण्‍यासाठी माझा प्रयत्‍न असेल असे त्‍यांनी सांगितले.

   कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खो-यात वळविण्‍यासाठी डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्‍ट्र पाणी परिषदेच्‍या माध्‍यमातून केंद्र आणि राज्‍य सरकारला मसुदा सादर केला होता. त्‍याचेच आता धोरणात रुपांतर झाले. विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता हा महत्‍वकांक्षी प्रकल्‍प पुर्ण करणाचे ध्‍येय ठेवले आहे. राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी पुढाकार घेतल्‍याने गोदावरीच्‍या तुटीच्‍या खो-यात पाणी वळविण्‍याचे एैतिहासिक काम भविष्‍यात पुर्ण करण्‍यासाठी आता वाटचाल असेल. कृ‍ष्‍णा खो-यातील पाणी प्रश्‍नाबाबतही निश्चित असे धोरण घ्‍यावे लागेल. बिगर सिंचनाचे वाढते प्रमाण, शेतीच्‍या पाण्‍याचे निर्माण होणारे प्रश्‍न, पाण्‍याची उधळपट्टी थांबविणे आणि पाणी सोडण्‍याच्‍या वितरण व्‍यवस्‍थेत चांगली सुधारणा करणे. यासाठी आता काम करावे लागणार असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.

   विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही, यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, विरोधी पक्षाचा अवतार निवडणूकीतच संपला होता. निवडणूकीच्‍या दरम्‍यानच महाविकास आघाडीत बिघाडी सुरु झाली होती. त्‍यांचे अस्तित्‍व आता राहीलेले नाही अशी टिका करुन, त्‍यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाच्‍या संदर्भात जरांगे पाटील यांनी नव्‍या  सरकारला थोडा वेळ दिला पाहीजे. यापुर्वी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले आरक्षण कायदेशिरदृष्‍ट्या टिकले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्‍याबाबत आमचे सरकारही सकारात्‍मकच आहे. मात्र मध्‍यंतरी महाविकास आघाडी सत्‍तेवर आल्‍यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गमवावे लागले. आरक्षणाच्‍या बाबतीत महाविकास आघाडी गंभिर नव्‍हते याचे पाप त्‍यांच्‍या डोक्‍यावर आहे.

   राज्‍यात महायुतीचे सरकार होते त्‍यावेळी आरक्षणाच्‍या बाबतीत आवश्‍यक तेवढे सर्व निर्णय घेण्‍यात आले होते. मागासवर्ग आयोगाची निर्मिती केली. राज्‍यात ५८ मोर्चे आणि अनेकांचे बलिदान झाले. पण ही सर्व परिस्थिती संयमाने हाताळण्‍याची जबाबदारी ही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्‍वी केली होती. आताही त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍यात नव्‍याने सरकार स्‍थापन झाले आहे. इतर कोणत्‍याही समाजाच्‍या  आरक्षणाला धक्‍का न लावता, चर्चेतुन हा प्रश्‍न सोडविता येईल. जरांगे पाटलांनी नव्‍या सरकारला थोडा वेळ दिला पाहीजे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

   बीड आणि परभणी येथील घटनेबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्‍तर देताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, या दोन्‍हीही घटनांबाबत मुख्‍यमंत्र्यांनी नागपुर आधिवेशनामध्‍ये सरकारची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. या दोन्‍हीही घटना अतिशय दुर्दैवी असून, दोषी व्‍यक्तिंवर कारवाई करण्‍याच्‍या सुचनाही देण्‍यात आल्‍या आहेत. घटनेबाबत आता चौकशी समितीही नेमण्‍यात आली असून, या घटनेचे आता राजकारण करु नये. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येवून जातील परंतू त्‍यानंतर निर्माण होणारा सामाजिक तणाव तसेच जातीजातींमध्‍ये उमटणारे पडसाद याची जबाबदारी ते घेणार का असा सवाल ना.विखे पाटील यांनी उपस्थित केला.

अण्णा हजारे यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत

   समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार यांच्‍या कुटूंबातील विवाह सोहळ्यास मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थि‍त होते. डॉ.विखे पाटील फौंडेशनमध्‍ये पद्मविभूषण आण्‍णासाहेब हजारे यांच्‍यासह मंत्री विखे पाटील यांनी त्‍यांचे स्‍वागत केले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.
Continue Reading

गावागावातुन

पुणे जिल्हा परिषदेचा गलथान कारभार .. गावाला त्रास , सरपंच दिपक पोखरकर यांचे अर्धनग्न होत आंदोलन

Published

on

Share

मंचर (प्रतिनिधी)

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मंचर निरगुडसर रस्त्यावर पिंपळगाव तर्फे महाळुंगे गावाच्या लगत मंजूर असणारे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे कामाची सुरुवात केली. गावानजीक असणारा उतार कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ता खोदाई करून तो मुरूम व माती काढून टाकली आहे .त्यानंतर गेले एक ते दीड महिना काम बंद असल्याने या रस्त्यावर उडणार्या धुळीचा त्रास पिंपळगाव ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे . तक्रारी करुन पाठपुरावा करुनही रस्त्याचे काम सुरू होत नाही.

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानेच या रस्ताचे काम रखडल्याचे सांगत पिंपळगाव खडकी गावचे सरपंच दिपक पोखरकर यांनी अर्ध नग्न होत आज ग्रामस्थां समवेत आंदोलन केले. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे .या गलथान कारभारामुळे पिंपळगाव ग्रामस्थांना रोज होत असणारा त्रास कधी बंद होणार आहे. असा प्रश्न सरपंच दिपक पोखरकर व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे

मंचर निरगुडसर रस्त्यावर तुकानाना चौक ते पिंपळगाव खडकी जिल्हा मार्ग क्रमांक २४ या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दीड कोटी रुपये निधी मंजूर केला आहे .सदर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होणार आहे . त्यासाठी निविदा होऊन ठेकेदार ठरविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सदर ठेकेदाराने पिंपळगाव गावालगतच्या रस्त्यावर असणारा चढ कमी करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे.

या केलेल्या खोदकामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गावात राहणाऱ्या नागरिकांना व शाळेत येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर उडणार्या धुळीमुळे त्रास सहन करावा लागत आहे .

गेली एक ते दीड महिना त्रास सहन करून थकलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केल्याने सरपंच दिपक पोखरकर यांनी बांधकाम विभाग जिल्हा परिषद पुणे यांचे उपअभियंता महेश परदेशी यांच्याशी वारंवार संपर्क करुन रस्ता दुरुस्त करण्याचे काम लवकरात लवकर सुरू करा अशी विनंती केली .मात्र उपअभियंता परदेशी यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा सरपंच दिपक पोखरकर यांनी आरोप केला आहे.

ठेकेदाराची अरेरावी.. सरपंचांचा आरोप

सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे तेथे दररोज पाणी मारण्यात यावे . या रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे असे ठेकेदाराला सांगूनही संबंधित कामाचा ठेकेदार अरेरावी करत आहे. वारंवार सांगुणही काम सुरू करत नाही. रस्त्यावर धुळ उडत आहे. तेथे पाणी मारायला सांगुणही ठेकेदार पाणी मारत नाही. पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारीही ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत.असा आरोपही सरपंच दिपक पोखरकर यांनी केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या अडचणी

पिंपळगाव खडकी येथील खोदाई केलेल्या रस्त्यालगत काही ग्रामस्थांच्या हरकती आहेत त्यामुळे काम सुरू होत नाही. उप अभियंता महेश परदेशी यांनी या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असताना ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सरपंच दिपक पोखरकर यांनी आंदोलन करतेवेळी सांगितले

खोदाई केल्यानंतर निघालेल्या माती व मुरुमाचे जिल्हा परिषदने काय केले..?

पिंपळगाव खडकी गावादरम्यान काँक्रीट रस्ता करण्यासाठी उतार कमी करण्यासाठी खोदाई करून निघालेले माती व मुरूम याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने काय केले..? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सदर खोदाई करताना जिल्हा परिषदेने महसूल विभागाची परवानगी घेतली होती का..? सदर खोदाई मधून निघालेल्या माती मुरमाची रॉयल्टी शासनाला जमा करण्यात आली आहे का..? सदर माती मुरूम वाहतूक करताना महसूल विभागांने परवानगी दिली होती का..? याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

कोण आहेत उपअभियंता महेश परदेशी ..?

पिंपळगाव खडकी येथील कामात उपअभियंता हलगर्जीपणा करत आहेत असा आरोप केला आहे. सरपंच दिपक पोखरकर यांनी आरोप केलेले उपअभियंता महेश परदेशी नक्की कोण आहेत…? असा प्रश्न उपस्थित केला ‌.तेव्हा माहीती घेतली असता


महेश परदेशी हे अहील्यानगर जिल्ह्यातून आंबेगाव सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून 2018-19 मध्ये रुजू झाले. त्यांनी आंबेगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून अंदाजे तीन वर्षे काम केले. आंबेगाव तालुक्यात काम करत असताना त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कामाची ही जबाबदारी दिली जायची.त्यानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून बढती मिळाली विशेष म्हणजे बढती मिळाल्यानंतरही त्यांना उपअभियंता म्हणून जुन्नर आंबेगाव पंचायत समितीचा कार्यभार मिळाला अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची बदली कार्यरत जिल्ह्याबाहेर होत असते.

मात्र महेश परदेशी आंबेगाव तालुक्यात शाखा अभियंता होते आणि पुन्हा लगेचच त्यांची उपअभियंता म्हणून आंबेगाव मध्येच बढती झाली. त्यांचे शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांमध्ये चांगले संबंध आहेत त्यांना राजकीय पाठबळ असल्याचीही चर्चा आहे .त्यामुळे ते आंबेगाव तालुक्यात व जुन्नर तालुक्यात उप अभियंता म्हणून राजे शाही पणे काम करत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या सोबतीला नेहमी विशेष राजकीय लोकांचाही गराडा असतो.

सरपंच पोखरकर यांचे अर्धनग्न आंदोलन पिंपळगावकरांना त्रासापासून वाचवेल का ..?

खराब रस्ता चांगला होईल आणि आपल्या गावांमधून जाणाऱ्या वाहन चालकांना व ग्रामस्थांना चांगला रस्ता तयार होईल.. अशा अपेक्षेने सरपंच दिपक पोखरकर यांनी सदर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी शासन दरबारी व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रस्त्याचे काम सुरू झाले मात्र ते शासनातील काही अधिकार्यांच्या अनास्थेमुळे बंद पडले आहे का? चांगला रस्ता मिळावा यासाठी केलेला अट्टाहास पुर्ण होण्याऐवजी मिळण्याऐवजी मानसिक त्रास आणि धुळीचा त्रास पिंपळगावकरांना सोसावा लागला आहे. त्यामुळे अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ सरपंचांवर आली आहे. सरपंच दिपक पोखरकर व ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन करूनही हा रस्ता कधी सुरू होणार याबाबत पिंपळगाव ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करत आहेत.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या रखडलेल्या कामाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे.अशी अपेक्षाही पिंपळगाव ग्रामस्थांनी आंदोलनावेळी बोलून दाखवली आहे. त्यामुळे पिंपळगाव करांना सरपंचाच्या आंदोलनानंतर तरी त्रास बंद होईल का? हे आगामी काळात पहावे लागेल.

Continue Reading

गावागावातुन

इंडिया आघाडीच्या आंदोलनात खासदार नीलेश लंके यांचा सहभाग

Published

on

Share

संतोष देशमुख हत्या, बांगलादेशातील अत्याचाराविरोधात आंदोलन

नगर : प्रतिनिधी

    बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच बांगलादेशातील हिंदू व ख्रिश्चन बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या कामकाजास सुरूवात होण्यापूव संसदेसमोर आंदोलन केले. नगरचे खासदार नीलेश लंके हे या आंदोलनात सहभागी झाले होते. 
     
हत्येचा आरोप असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, खुनाचे कारण असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपींना हत्येच्या गुन्हयात आरोपी करा, आरोपींना अटक करून खटला अंडर ट्रायल चालवा,  अशा प्रकारच्या खंडणी, अपहरण, छळ, खुनाच्या सर्व गुन्हयांचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडून करण्यात यावा, बीड जिल्हयामध्ये कायद्याचे राज्य स्थापन करा अशा मागण्या यावेळी इंडिया आघाडीच्या खासदारांकडून करण्यात आल्या. 
      
बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचारावर केंद्र सरकार बोलत नाही म्हणून खासदारांनी हातात बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्या पाठीशी उभे रहा असे लिहिलेल्या बॅग हाती घेत आंदोलन केले. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधीही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

Continue Reading
Advertisement

Trending