शैक्षणिक
प्रा.गोरडे यांना जिल्हास्तरीय आदर्श गूणवंत पुरस्कार .
लोणी धामणी प्रतिनिधी – राजु देवडे
निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा.अरुण भगवंत गोरडे यांना
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ पुणे यांच्या वतीने ” जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत पुरस्कार
” लोकमतचे संपादक संजय आवटे,आमदार महेश लांडगे , माजी शिक्षक आमदार भगवान साळुंके,शिक्षणाधिकारी डॉ . भाऊसाहेब कारेकर यांच्या उपस्थित अंकुराराव लांडगे सभागृह भोसरी येथे रविवार (दि :०६/१०/२०२४ ) रोजी प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष,सचिव व त्यांचे सर्व पदाधिकारी व माजी प्राचार्य बी.डी.चव्हाण , निरगुडेवर शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश तापकीर,संचालक मुख्याध्यापक सुनिल वळसे,प्राचार्य कांताराम टाव्हरे, मुख्याध्यापक विनोद बोंबले,पर्यवेक्षक संतोष वळसे,संतोष खालकर, उद्योजिका ज्योती गोरडे,आदित्य कामठे,प्रगती कामठे-गोरडे,युवा उद्योजक प्रतिक गोरडे व विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच जिल्ह्यातील अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार मिळल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील,उपाध्याक्ष रामदास वळसे पाटील व सर्व संचालक व ग्रामस्थांनी प्रा.गोरडे यांचे अभिनंदन केले .
गावागावातुन
पुणे विभागीय स्पर्धेत मंचर येथील महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे घवघवीत यश
पुणे (प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा परिषद, पुणे आयोजित पुणे विभागीय मैदानी स्पर्धा बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाली या स्पर्धेत महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कूल मंचरचा विद्यार्थी कु.संग्राम शीतल साईनाथ लोंढे याने 400 मीटर व 600 मीटर रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले. त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल विठ्ठल गांजाळे यांनी परिश्रम घेतले व शाळेच्या मुख्यधपिका चित्रा अरविंद बांगर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व स्थानिक स्कूल समिती यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
गावागावातुन
शालेय विद्यार्थ्यांची डाळ मिलला भेट
मंचर
नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये इयत्ता ६ वी पासून विद्यार्थ्यांना कौशल्या वर आधारित शिक्षण देणे, परिसरातील विविध व्यवसाय यांना भेटी देऊन २२ व्या शतकातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करणे या हेतूने वडगावपीर मांदळेवाडी शाळेतील इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी लोणी ( ता.आंबेगाव ) येथे प्रगती डाळ मिल या लघु उद्योगास भेट दिली.यावेळी प्रगती डाळ मिलच्या संचालिका ज्योती गोरडे यांनी या व्यवसायाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांशी हितगुज केले. तसेच प्रा.अरुण गोरडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून भविष्यातील आव्हाने पेलविणारे सुजान नागरिक आणि उद्योजक बनण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
.तदनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोणी येथे भेट देण्यात आली.त्याठिकाणी बँकेचे व्यवस्थापक निर्मला चव्हाण यांनी बँकेत व्यवहार कसे चालतात कोणत्या सुविधा नागरिकांना मिळतात याची माहिती सांगून बँकेतील विविध फॉर्म विद्यार्थ्यांना हाताळण्यास दिले.नंतर भैरवनाथ विद्यालय लोणी येथील प्रयोग शाळेस भेट देऊन त्या ठिकाणी विज्ञान शिक्षक प्रयोद चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रयोग शाळेतील साहित्याची माहिती देऊन साहित्य हाताळण्यास दिले.आणि छोटे छोटे प्रयोग दिग्दर्शन करून विद्यार्थ्यां मध्ये वैज्ञानिक दृष्टी जागृत केली. सदर क्षेत्र भेट घडवून आणणे कामी वडगावपीर शाळेचे मुख्याध्यापक भगवंत टाव्हरे आणि मांदळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक सखाराम मुंजाळ यांनी नियोजन केले होते.
गावागावातुन
वाढदिवसाचा खर्च टाळून जारकरवाडीत गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
मंचर
जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात आठवी, नववी, दहावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या गरिब व होतकरू विद्यार्थ्याला उद्योजक हनुमंत काकडे यांच्या संकल्पनेतून सचिन अर्जुन लबडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तीन विद्यार्थ्यांना वर्षभरात लागणारे शालेय साहित्य शैक्षणिक फी, शालेय गणवेश मोफत वाटप करण्यात आल्याचे हनुमंत काकडे व सचिन लबडे यांनी सांगितले.

त्यांच्या या उपक्रमाचे जारकरवाडी परिसरात कौतुक होत आहे. अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी किंवा पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त होते. पैसे अभावी गरीब गरजू विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन शालेय विद्यार्थ्यांना मदत केल्याचे सचिन लबडे यांनी सांगितले.
यावेळी माजी चेअरमन शिवाजी भोजने, माजी उपसरपंच शरद भोजने, शरद पतसंस्थेचे संचालक रवींद्र काकडे, डॉ महादु भोजने, ग्रा पं.सदस्य सुरेश मंचरे, बाबाजी देवडे , नवनाथ जारकड, पोपट लोले, आनंदा भोजने, योगीत लबडे, प्रशांत लबडे, सचिन लबडे शालेय विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेंगाळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोमीन सर यांनी मानले.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन1 year agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन1 year agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक10 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
