मनोरंजन
२०० प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकरीचा लाभ, खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश

नगर : प्रतिनिधी
राहुरी कृषि विद्यापीठासाठी जमिनी अधिगृहीत करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला असून या निर्णयामुळे राहुरी व परिसरातील २०० तरूणांना नोकरीचा लाभ मिळणार आहे. याप्रकरणी खा. नीलेश लंके हे गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते.
या प्रकल्पग्रस्तांनी दाखल्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी शाहूराव मोरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जाचक अटी लादून प्रकल्पग्रस्तांचे दाखल फेटाळून लावले होते. दोन वर्षांपूर्वी राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर प्रभाकर पवार, विकास भिंगारदे, भूषण शेंडगे, जगदीश अडसुरे,कुणाल कर्डक, आरबाज शेख, रवींद्र गिरगुणे आदींनी तत्कालीन आमदार नीलेश लंके यांच्याकडे या प्रश्नाचे गाऱ्हाणे मांडले.
लंके यांनी याप्रश्नी तात्काळ तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे साकडे घातले होते. खा. लंके यांच्या पाठपुराव्यादरम्यान या प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र शासन आदेश काढावा लागेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.
राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी नव्या सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याशी चर्चा करून या प्रश्नात तोडगा काढण्याची मागणी केली होती. मंत्री जाधव पाटील यांना तसे निवेदनही खा. लंके यांनी सादर केले होते.
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी शासन निर्णय पारीत केला असून त्यामुळे राहुरी व परिसरातील सुमारे दोनशे प्रकल्पग्रस्तांना आता नोकरीची संधी मिळणार आहे.
या प्रकल्पग्रस्तांना मिळाले दाखले !
खा. नीलेश लंके यांच्या प्रयत्नानंतर शासन निर्णय पारीत झाल्यानंतर दिपक भिंगारदे, विकास भिंगारदे, असिफ शेख, भुषण शेंडगे, शुभम गायकवाड, सोमनाथ मगर, कुणाल कर्डक, नितीन ताकटे, ॠषीकेश देशमुख, विशाल पवार, शैलेश धोंडे, खेडेकर, श्रीकांत पवार, दादासाहेब भिंगारदे, बाळू भिंगारदे, दर्शन गाढवे, प्रविण देठे, दिनेश शेंडगे, प्रविण गिरगुणे, अमोल गिरगुणे.
गावागावातुन
पारनेर तालुक्यात विक्रमी ४ हजार १४७ घरकुले मंजुर !खासदार नीलेश लंके यांची माहिती

पारनेर : प्रतिनिधी
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यात विक्रमी ४ हजार १४७ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा क्र. ३ मध्ये ७९९ व टप्पा क्र.४ मध्ये ३ हजार ५२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून ३०० घरकुले मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.
आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या गरजू नागरीकांचे घराचे स्वप्न घरकुले मंजुर झाल्याने होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या कुटूंबाला घर मिळवून देणे, दारित्रय रेषेखालील कुटूंबांना स्थिर आणि सुरक्षित घरांची सुविधा पुरविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यात घरकुलांची मोठया प्रमाणावर मागणी होती. यापूर्वी काही घरकुलांना मंजुरी मिळाली. यावर्षी मोठया प्रमाणावर घरकुलांना मंजुरी मिळाल्याने हजारो कुटूंबांच्या घरकुलाचे स्वप्न आता दृष्टीपथात आले असून त्यांचे जीवन साकार होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणार आहे यात समाधान असल्याचे लंके यांनी सांगितले.
एकूण मंजुर घरकुलांपैकी ३०० घरकुले मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील, इतर काही अडचणी असतील तर आपल्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन खा. लंके यांनी केले आहे.
पारनेर तालुक्यातील सर्व सरपंच, लाभार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, गृहनिर्माण अभियंता, पंचायत समितीमधील सर्व संगणक चालक, विस्तार अधिकारी यांनी या घरकुलांच्या मंजुरीसाठी परीश्रम घेतले.
प्रथमच ४ हजारांवर घरकुले !
दुष्काळी पारनेर तालुक्यात घरकुलांची मागणी मोठी असणे साहाजिक असून आजवर मोठया प्रमाणावर घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली नव्हती. घरकुलांबाबत केंद्र सरकारने धोरण घेतल्यानंतर आपण प्रत्येक ग्रामपंचायतीशी संपर्क करून घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आपल्या संपर्क कार्यालयाकडूनही वारंवार घरकुलांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत विविध ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करण्यात येत होता. एकत्रीत प्रयत्नांतून तालुक्यात प्रथमच तब्बल ४ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली यात मोठे समाधान आहे.
खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य
देशविदेश
संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी धार्मिक कार्यक्रमात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा – माजी मंत्री दिलीप वळसे पाटील

मंचर प्रतिनिधी
संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी गावागावात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होत असून आपल्या निरगुडसर गावातही मोठ्या उत्साहात अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.
या सप्ताहात ज्येष्ठांची संख्या भरपूर आहे काही प्रमाणात तरुण देखील आहेत. मात्र गावातील धार्मिक कार्यक्रमात तरुणाची सहभाग घेतल्यास कार्यक्रमाला अधिक शोभा येईल असे मत राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
श्री धर्मराज बीज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह समाप्तीचे दिवशी काल्याचे किर्तन संपन्न झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी वळसे पाटील पुढे बोलताना म्हणाले की निरगुडसर गावात गेले सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. शेवटच्या दिवशी ह भ प धनंजय महाराज चव्हाण यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.
त्यांनी त्यांच्या कीर्तनात श्रीकृष्ण यांच्या लीला सांगितल्या समाजाला विविध उपदेश दिले. मात्र कीर्तन ऐकण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी, युवकांनी याचा बोध घेऊन किर्तन ऐकून घरी जात असताना कीर्तनातील चांगल्या गोष्टीं आत्मसात करून त्याचे आचरण आपल्या आयुष्यात करणे गरजेचे आहे. आपल्या गावातील श्री महादेवाच्या मंदिराचे काम सुंदर झाले.
असुन पुढील काही दिवसात या मंदिर उत्सवाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. असेही वळसे पाटील म्हणाले,

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे ,शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, निरगुडसरचे सरपंच रवींद्र वळसे पाटील, उपसरपंच नितीन टाव्हरे, आनंदराव वळसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश टाव्हरे, प्रमोद वळसे, रामदास थोरात, भाऊसाहेब वळसे,सुनील टाव्हरे, उर्मिला वळसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुवर्णा शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
देशविदेश
केंद्रीय मंत्री अमित शहा यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट!शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुरू करण्याची केली विनंती

लोणी दि.९ प्रतिनिधी
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकार मध्ये मंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर विखे पाटील यांची पहीलीच भेट होती.शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुविधा तातडीने सुरू करण्याची तसेच नदीजोड प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे. डॉ सुजय विखे पाटील याप्रसंगी उपस्थित होते.
मागील अडीच वर्षात महायुती सरकारने सामान्य नागरीकांसाठी यशस्वीपणे राबवलेल्या योजनांना जनतेचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे सांगतानाच महसूल व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णय व कार्यान्वित झालेल्या योजनांची माहीती मंत्री विखे पाटील यांनी भेटीत झालेल्या चर्चे दरम्यान दिली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश आणि अहील्यानगर मधील दहा विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर
मंत्री अमित शहा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सविस्तर चर्चा झाली.या भेटी दरम्यान डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित होते.
महायुती सरकार मध्ये पुन्हा मंत्री पदाची संधी दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री
अमित शहा यांचे आभार मानले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे.
शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याबाबत केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देवून आजच केंद्रीय सुरक्षा दलाचे मनुष्यबळ उपलब्ध करून देवून पुढील काही दिवसांत नाइट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याची ग्वाही मंत्री अमित शहा यांनी दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

-
गावागावातुन7 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन7 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन9 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक5 months ago
देवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन10 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक2 months ago
शेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
गावागावातुन10 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर